GST Slab Change 2025 : पनीर-दूध, सिमेंट, औषध आणि नव्या कारवर किती जीएसटी लागणार? आठ मोठे प्रश्न आणि त्यावरचे A to Z उत्तर
GST Council Meeting Update : जीएसटी कौन्सिलने अन्नधान्य, कृषी उत्पादने, सिमेंट, औषधे, वाहनं व इन्शुरन्सवर GST दर कमी केले आहेत. 28% आणि 12% स्लॅब हटवून नवे 5% आणि 18% दर लागू केले आहेत.

GST Council 2025 : जीएसटी कौन्सिलने सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला असून जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. 12% आणि 28% स्लॅब हटवून (GST Slabs Removed) फक्त 5% आणि 18% कर रचना राहणार आहे. यामुळे रोटी, पनीर, दूध (Food GST), सिमेंट (Cement GST), औषधे (Medicines GST), वाहनं (Automobile GST) आणि इन्शुरन्स (Insurance GST) यावर कर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार असून, दैनंदिन वस्तूंवर कर जवळपास 0% ते 5% पर्यंत कमी झाला आहे.
सर्व प्रकारच्या रोटी, पनीर आणि प्रोसेस्ड दुधावरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. दैनंदिन जीवनातील वस्तूंवर 5% स्लॅब लागू होणार आहे.
कृषी उत्पादनांवरील जीएसटी 12% वरून कमी करून 5% करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या वापरातील बहुतांश वस्तूंवरील कर घटवण्यात आला आहे.
मध्यमवर्गाला दिलासा देत सिमेंटवरील कर 28% वरून कमी करून 18% करण्यात आला आहे.
कॅन्सर आणि रेअर ड्रग्सवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जीएसटी 28% वरून कमी करून 18% करण्यात आला आहे. यात बस, ट्रक, अॅम्ब्युलन्स, थ्री-व्हीलर आणि ऑटो पार्ट्स यांचाही समावेश आहे.
साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 18% वरून 5% किंवा काही वस्तूंवर 0% करण्याची तयारी आहे.
इंडिव्हिज्युअल हेल्थ, लाइफ व रिइन्शुरन्स पॉलिसींवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. तसेच टर्म लाइफ, ULIP, एंडोमेंट पॉलिसी, फ्लोटर पॉलिसी आणि वरिष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींनाही पूर्ण सूट दिली आहे.
पान मसाला, तंबाखू यांसारख्या सिन गुड्स आणि अल्ट्रा लक्झरी वस्तूंवर हा 40% चा विशेष स्लॅब लागू करण्यात आला आहे.

























