एक्स्प्लोर
Arun Gawli News : 18 वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन ‘डॅडी’ अखेर तुरुंगातून बाहेर; अरुण गवळी किती दिवस असणार बाहेर?
नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेवून गवळीची याचिका मंजूर करून कारागृह उपमहानिरीक्षकांचा वादग्रस्त आदेश रद्द केला. त्याचबरोबर, अरूण गवळीची रजा मंजूर केली आहे.
Arun gawli at nagpur airport
1/6

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
2/6

अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला असून थोड्या वेळात नागपूर मध्यवर्ती कारागृहातुन सुटका झाली.
3/6

गेल्या वर्षी 18 ऑगस्ट 2024 रोजी अरुण गवळीने (Gangster Arun Gawli) नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता.
4/6

कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी जामिनावर नागपूरच्या मध्यवर्ती तुरूंगातून बाहेर आला आहे. नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळी याला नागपूरच्या डॅा बाबासाहेब आंबेडकर विमानतळ पर्यंत आणले.
5/6

आता अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला होता. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील १८ वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता.
6/6

जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 18 वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
Published at : 03 Sep 2025 04:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























