Manoj Jarange Patil Speech In Azad Maidan: खाली बस्स, नाहीतर निघ इकडून...; आझाद मैदानात पोहचताच मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Manoj Jarange Patil Speech In Azad Maidan: आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

Manoj Jarange Patil Speech In Azad Maidan मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आझाद मैदानात दाखल झाले आहेत. आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे आझाद मैदानात पोहचले. आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यावेळी भाषण करताना समोर कोणीतरी उभे होते. यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. बस्स खाली नाहीतर निघ इकडून, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
आझाद मैदानावर ठरवल्याप्रमाणे आलो, उपोषण सुरु केलंय, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले. आंदोलनाला आधी परवानगी नव्हती. त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली. सरकारने सहकार्य केलं, आता आपणही सहकार्य करु, असं मनोज जरांगेंनी सांगितले. कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही. मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
दारु प्यायची नाही, याच आझाद मैदानात राहायचं आणि झोपायचं- मनोज जरांगे
मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. पोलिसांना सहकार्य करा, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आपण कोणाला बोलायला संधी द्यायची नाही. दारु प्यायची नाही. माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका...याच आझाद मैदानात राहायचं आणि झोपायचं, असं मनोज जरांगे उपस्थित मराठा आंदोलकांना म्हणाले.
आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगेंचे मोठ्या गर्जना-
- कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही
- मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाल्याशिवाय इथून हालायचं नाही
- सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, आता आपणही सरकारला सहकार्य करावं. समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणी वागू नका.
- दारु पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका.
- मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही
- कोण काय सांगतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतंय का हे गांभीर्याने पाहा
- दोन तासात मुंबई मोकळी करुन द्या, पोलिसांना सहकार्य करा, एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या..
मनोज जरांगेंची आतापर्यंतची उपोषणं- (Manoj Jarane In Mumbai)
- पहिले उपोषण
29 ऑगस्ट ते 14 सप्टें, 2023
अंतरवाली-सराटी
- दुसरे उपोषण
25 ऑक्टो ते 2 नोव्हेंबर 2023
अंतरवाली
- तिसरे उपोषण
26 आणि 27 जानेवारी 2024
नवी मुंबई
- चौथे उपोषण
10 ते 26 फेब्रुवारी 2024
अंतरवाली
- पाचवे उपोषण
4 ते 10 जून 2024
अंतरवाली
- सहावे उपोषण
20 ते 24 जुलै 2024
अंतरवाली
- सातवे उपोषण
25 ते 30 जानेवारी 2025
अंतरवाली
- आठवे उपोषण
29 ऑगस्ट
आझाद मैदान
























