घरातून कामसाठी निघाला, मराठा आंदोलकांना बघताच स्वत:चा जेवणाचा डबा देऊन टाकला; डोळे पाणावणारा VIDEO
Manoj Jarange Patil Maratha Protest Mumbai: हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने मराठा आंदोलकांची जेवणाची अडचण निर्माण झालीय. याचदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Manoj Jarange Patil Maratha Protest Mumbai: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झाले. आंदोलकांना भररस्त्यावर स्नान करायला लागलं, तर मराठा आंदोलकांनीच आंदोलकांसाठी नाष्ट्याची सोय केली. हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची अडचण निर्माण झालीय. याचदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मराठा आंदोलक काल सकाळी मुंबईत दाखल झाले. यावेळी काही मराठा आंदोलक आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले होते. तर काही आंदोलक आझाद मैदान जवळील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बसले होते. यावेळी मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकावर घरुन घेऊन आलेलं जेवण खात बसले होते. यादरम्यान कामासाठी निघालेल्या एका मुंबईकराने स्वत:चा डबा मराठा आंदोलकांना खाण्यासाठी दिला. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी मुंबई कोणालाही उपाशी झोपू देत नाही, असं म्हणतात, ते आज कळलं, अशा कमेंट्स देखील या व्हिडीओवर येत आहेत.
View this post on Instagram
हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना-
आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाण्याचा पत्ता नसल्याने मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या आंदोलकांना पॅकबंद पाण्याच्या बॉटल्स घेऊन शौचालयात जावे लागत आहे. मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम केल्यानंतर मराठा बांधवांनी आझाद मैदानाकडे कूच केले. मात्र, आज सकाळीही या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलकांनीच आपल्या बांधवांसाठी नाश्त्याची सोय केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
























