Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल, गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी; सरकारने CRPF अन् CISF ची तुकडी मैदानात उतरवली!
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे.

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha मुंबई: मुंबईत मराठा आंदोलनाचा (Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha) दुसरा दिवस आहे. हजारो आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेत. आंदोलकांची आझाद मैदानाबाहेर सीएसएमटी परिसरातही मोठी गर्दी झाली आहे. आंदोलकांच्या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झालीय. गेल्या अर्ध्यातासांपासून आंदोलक रस्त्यावर आहेत. पोलीस उपायुक्त स्वतः रस्त्यावर आलेत. तसंच सीआयएसएफची तुकडीही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणण्यात आली आहे. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाला देखील आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीएसएमटी परिसरात दाखल करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आज (30 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झाले. आंदोलकांना भररस्त्यावर स्नान करायला लागलं, तर मराठा आंदोलकांनीच केली आंदोलकांसाठी नाष्ट्याची सोय केली. हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची अडचण निर्माण झालीय. तर नवी मुंबईत मराठा आंदोलक चक्क रेडा घेऊन आंदोलनासाठी निघालेयत.
मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय-
मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची खंत तरुणांनी बोलवून दाखवली. जेवायला अन्न घेऊन आलोय, मात्र शौचालयासाठी सुद्धा सोय नाहीय, असं आंदोलकांनी म्हटलंय. अंगोळीला आंदोलकांनी टॅकरखाली बसावं लागत आहे. सरकार जाणीवपूर्वक आंदोलन चिरडण्यासाठी हे करत असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलकाने दिली.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस-
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झाले. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलंय. आंदोलनस्थळी पाणी आणि चिखल झालाय. त्यामुळे इथे बसणंही अशक्य झालंय. त्यामुळे संपूर्ण मैदानात आसरा शोधण्यात आंदोलकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे शौचायलांची वावना आहे. अपुऱ्य़ा शौचालयात पाणी नाही. बाहेर सीएसएमटी रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. दुतर्फा पार्क केलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झालीय. तर कालची रात्र आंदोलकांनी मिळेल तिथे आसरा घेतला. शेकडोजण सीएसएमटी स्थानकात पथारी पसरून झोपले. फोर्ट भागातल्या इमारतींखाली शेकडोजणांनी पथारी पसरली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

























