एक्स्प्लोर

Manoj Jarange Mumbai Morcha: 2 तासांत मुंबई रिकामी करा...; आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे असं का म्हणाले?

Manoj Jarange Mumbai Morcha: मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केलाय. आंदोलकांनाही सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.

Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केलंय. आज सकाळी मोठं शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली. मनोज जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केलाय. आंदोलकांनाही सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. तसेच मराठ्यांना शांततेचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केलं.  

पुढील 2 तासांत मुंबई रिकामी करा-

आझाद मैदानावर ठरवल्याप्रमाणे आलो, उपोषण सुरु केलंय, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले. आंदोलनाला आधी परवानगी नव्हती. त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली.  सरकारने सहकार्य केलं, आता आपणही सहकार्य करु, असं मनोज जरांगेंनी सांगितले. कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही. मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. तसेच मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी झाली आहे. काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जावे, पुढील 2 तासांत मुंबई रिकामी करा...काहीजण वाशीत मुक्काम करा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. मुंबईत आंदोलकांची अडचण होऊ नये, पावसाचे दिवसही आहे. त्यामुळे काही आंदोलकांनी मुंबई सोडून मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशीत आंदोलन सुरु करावे, असं आवाहन मनोज जरांगेंनी केले. 

मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही- मनोज जरांगे

मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही,  असं मनोज जरांगे म्हणाले. पोलिसांना सहकार्य करा, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आपण कोणाला बोलायला संधी द्यायची नाही. दारु प्यायची नाही. माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका...याच आझाद मैदानात राहायचं आणि झोपायचं, असं मनोज जरांगे उपस्थित मराठा आंदोलकांना म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil Speech In Azad Maidan: खाली बस्स, नाहीतर निघ इकडून...; आझाद मैदानात पोहचताच मनोज जरांगे काय काय म्हणाले?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: 53 वर्षांच्या अर्जुन रामपालनं 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाआधीच अभिनेता दोन मुलांचा बाप
53 वर्षांच्या अर्जुन रामपालनं 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाआधीच अभिनेता दोन मुलांचा बाप
Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Embed widget