News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

जात पंचायतविरोधी कायदा एकमताने मंजूर

FOLLOW US: 
Share:
मुंबई : महाराष्ट्राला जात पंचायतीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी राज्य सरकारने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. विधानसभेत सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण देणारा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे.   'महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) विधेयक 2016 ' यानुसार आता जात पंचायतींच्या कारनाम्याला आळा बसेल.   या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.   या विधेयकामुळे सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीला संरक्षण मिळेल. तसंच जात पंचायत आणि सामाजिक बहिष्कार निर्मूलनाबाबत पावले उचलली जातील.   यापुढे कोणत्याही व्यक्तीला सामाजिक बहिष्कृत करता येणार नाही, अथवा वाळीत टाकता येणार नाही. अशा प्रकारचे कृत्य यापुढे अपराध ठरणार आहे. असा अपराध करणाऱ्याला 3 वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.   बहिष्कृत किंवा वाळीत टाकण्यास मदत करणाऱ्यांनासुद्धा दोषी धरले जाईल.   वाळीत टाकण्याच्या सर्वाधिक घटना रायगड जिल्ह्यात घडल्या आहेत. वर्षभरात रायगडात 46 गुन्हे दाखल झाले असून, 633 जणांचा गुन्ह्यात सहभाग आहे.   एबीपी माझाने वेळोवेळी राज्यभरातील जात-पंचायतींच्या अनिष्ठ प्रथांवर प्रकाशझोत टाकला होता. जातपंचायतींच्या कारनामा उघडा पाडून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.  एबीपी माझाने राबवलेल्या मोहिमेला या निमित्ताने यश आल्याचं दिसून येत आहे.
Published at : 13 Apr 2016 11:43 AM (IST)

आणखी महत्वाच्या बातम्या

Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज

Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, तर चिखलीकरांसह हेमंत पाटलांची मोर्चेबांधणी,  महापालिकेत कोण उधळणार गुलाल?

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, तर चिखलीकरांसह हेमंत पाटलांची मोर्चेबांधणी,  महापालिकेत कोण उधळणार गुलाल?

मोठी बातमी! माजी आमदार संदीप नाईकांची अखेर घरवापसी,  प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश 

मोठी बातमी! माजी आमदार संदीप नाईकांची अखेर घरवापसी,  प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश 

रायगडमध्ये महायुती राहणार का? सुनिल तटकरे म्हणाले योग्य वेळी अचूक निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा 

रायगडमध्ये महायुती राहणार का? सुनिल तटकरे म्हणाले योग्य वेळी अचूक निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा 

लातूर महानगरपालिकेत 18 प्रभागांतील 70 जागांसाठी रणसंग्राम, काँग्रेसह भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी 

लातूर महानगरपालिकेत 18 प्रभागांतील 70 जागांसाठी रणसंग्राम, काँग्रेसह भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी 

टॉप न्यूज़

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात  22814 कोटी रुपये काढून घेतले

Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार

Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार

S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार