एक्स्प्लोर

'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट

शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी कोणतंही भाष्य करणार नसल्याचं म्हटलं. तर अजित पवार यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याचवेळी आजोळातून मात्र पार्थ पवार यांना समर्थन मिळालं आहे.

उस्मानाबाद : "पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही ", अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर, आता पार्थ पवार यांना आजोळातून समर्थन मिळालं आहे. पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात, अशी पोस्ट नुकतेच भाजपवासी झालेले पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी फेसबुकवर केली आहे.

पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या बहिण आहेत. अजित पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. मल्हार पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे चिरंजीव आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे.

पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

मल्हार पाटील यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की, "तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिलं आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचं कसं हे आपल्याला माहित आहे."

शरद पवार काय म्हणाले होते? पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही."

पार्थ पवारांची प्रतिक्रिया शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

'जय श्री राम' म्हणत पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणतात...

पार्थ पवार गृहमंत्र्यांच्या भेटीला; सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

फोडाफोडीच्या राजकारणाला कोणाची फूस? पार्थ पवार यांचा पारनेर दौरा चर्चेत

Sharad Pawar | पार्थ पवार यांचं वक्तव्य इममॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaArjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
×
Embed widget