एक्स्प्लोर

'जय श्री राम' म्हणत पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणतात...

मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही लोकांना असं वाटत असेल, अशा शब्दात शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पार्थ पवार यांनी 'जय श्री राम' म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं. यावर पार्थची ही वैयक्तिक भूमिका असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुंबई : राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का असा प्रश्न विचारत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मात्र शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 'जय श्री राम' म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पार्थची ही वैयक्तिक भूमिका आहे. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच "सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे का की व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे? असा सवालही त्यांनी विचारला.

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. याबाबत पार्थ पवार यांनी ट्वीट करुन राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून 'जय श्री राम'चा जयघोष केला. राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन केंद्र सरकार आणि पर्यायाने मोदींना टोला लगवणाऱ्या शरद पवार यांना पार्थ यांची भूमिका पटणार का असा प्रश्नही विचारला जात आहे.

याआधी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारं पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलं होतं.

काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला

पार्थ पवार पत्रात काय म्हटलं आहे? "अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भूमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवासापाठी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत. राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपण पराभूत झाले आहेतच, आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे, असं ज्यांना वाटत आहे, त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे. आजच्या आधुनिक भारतात रामलल्ला यांना अयोध्येत हक्काचे जे होते ते मिळाले. या क्षणी रामराज्याची आठवण आपल्याला होणे साहजिक आहे. रामराज्य ही संकल्पना बापूंना प्रिया होती. रामराज्यात रामाची पूजा होत असे. कारण रामराज्यात प्रत्येक मनुष्यमात्र नव्हे तर प्राणीमात्रालाही सन्मानाने वागवलं जात असे."

सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण राम मंदिराच्या निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "मी हे पत्र पहिल्यांदा बघते, आम्हाला ते पत्र लिहिलेलं नाही. खरंच हे लिहिलं असेल तर ती पार्थ याची वैयक्तिक भूमिका आहे. यावर पक्षाचा लोगो नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे का की व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे?"

शरद पवार काय म्हणाले होते? "कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, प्राधान्य द्यायचं या निर्णय प्रत्येक जण घेत असतो. कोरोनामध्ये सापडलेल्या लोकांना बाहेर कसं काढायचं? त्या कामाला आपण प्राधान्य देऊ. काही लोकांना असं वाटत असेल मंदिर बांधून कदाचित कोरोना जाईल, त्या भावनेतून त्यांनी हा कार्यक्रम घेतला असेल. त्याची कारण आम्हाला माहित नाही. पण आमच्यादृष्टीने कोरोना संकट महत्त्वाचं आहे," असं शरद पवार म्हणाले होते.

Parth Pawar letter on Ram Mandir | पार्थ पवारांची भूमिका शरद पवार यांना पटणार का?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
Embed widget