(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yawatmal Nagarpanchayat Election Result : यवतमाळमध्ये कॉंग्रेसची सरशी, भाजपला मोठा धक्का
Yawatmal Nagarpanchayat Election Result : राळेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कळंब आणि बाभूळगाव राळेगाव या तीन नगर पंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील सहा नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील 102 जागा पैकी 39 जागांवर काँग्रेस उमेदवार जिंकून आले आहेत. तर 25 जागांवर शिवसेना 13 जागांवर भाजप आणि 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार चार जागेवर तर मनसे तीन जागेवर वंचित आघाडी एक आणि जंगोम दलाचे चार उमेदवार जागेवर जिंकून आले आहेत.
विशेष म्हणजे राळेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कळंब आणि बाभूळगाव राळेगाव या तीन नगर पंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राळेगावमध्ये मागील वेळी भाजपची सत्ता होती. आता मात्र येथे भाजपाला खाते सुद्धा उघडता न आल्याने भाजपची पिछेहाट दिसून आली.
राळेगावमध्ये 11 जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले. तर कळंब, बाभूळगावमध्ये केवळ दोन जागी भाजप उमेदवार आल्याने भाजपला तेव्हड्यावर समाधान मानावे लागले. तर झरी नगर पंचायतमध्ये 17 जागांपैकी केवळ एक जागा भाजपला मिळाली त्यामुळे हा विद्यमान भाजप आमदार संजीव रेड्डी बोडकुरवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय. या शिवाय मारेगावमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. महागावमध्येही काँग्रेस सात जागावर तर शिवसेना पाच आणि भाजपचे चार जागी उमेदवार विजयी झाले आहेत. तर झरीमध्ये काँग्रेस 5, शिवसेना 5, जंगोम दल 4, भाजप आणि मनसेचे प्रत्येकी एका जागेवर उमेदवार जिंकून आले आहेत. एकूणच जिल्ह्यातील काँग्रेसची आगेकूच तर भाजप ची जिल्ह्यात पीछेहाट पहायला मिळाली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके म्हणाले, हा लोकशाहीचा विजय आहे आणि जिथं कमी अधिक जागा आहे तिथं महाविकास आघाडीच्या पक्षातील नेत्यांशी एकत्र बसून आणि पक्षश्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनाखाली समविचारी पक्षाचे एकत्र बसून सत्ता स्थापन केली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pune Nagar Panchayat Election Result 2022 : देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता; भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे पराभूत
- NagarPanchayat Elections Result : बच्चूभाऊंचा 'प्रहार'! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का
- Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha