(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Nagar Panchayat Election Result 2022 : देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता; भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे पराभूत
Pune Nagar Panchayat Election Result 2022 : पुण्यातील नवनिर्मित देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनं एकहाती सत्ता काबीज केली आहे.
Pune Nagar Panchayat Election Result 2022 : पुण्यातील देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनं एकहाती सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर मोठा जल्लोष साजरा केला. भंडारा उधळत, फटाके फोडत, ढोल ताशांच्या तालावर काही कार्यकर्त्यांनी ठेकाही धरला. निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांची सरशी झाली आहे. तर भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांचा शेळकेंनी पराभव केला आहे. दरम्यान, राज्यातील सर्व नगरपंचायत निवडणुकींपैकी ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात होती.
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेनं राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन असल्यानं तिर्थक्षेत्राचा विकास करू, अशी ग्वाही शेळकेंनी यावेळी दिली आहे.
पुण्यातील नवनिर्मित देहू नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांची निवडणुकीसाठी मतदान 18 जानेवारी रोजी पार पडलं. एकूण 17 सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत ओबीसी प्रवर्गाच्या चार जागांवरील ही मतदान प्रक्रिया पार पडली. नवनिर्मित नगरपंचायत असल्यानं मतदारांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला होता. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानेंही भूमी पावन झाली असल्यानं, या गावाला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवड महापालिका या गावाला शहरात समाविष्ट करून घेण्यास उत्सुक आहे. पण गावकऱ्यांचा विरोध असल्यानं अखेर ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीत झालं. सतरा जागांपैकी तेरा जागांसाठी येथे मतदान पार पडलं.
पुण्यातील नवनिर्मित देहू नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार
- प्रभाग क्रमांक 1 : मीना कुऱ्हाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 2 : रसिका स्वप्निल (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 3 : पूजा दिवटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 4 : मयूर शिवशरण (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 5 : शीतल हगवणे (अपक्ष)
- प्रभाग क्रमांक 6 : पुनम काळोखे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
- प्रभाग क्रमांक 7 : योगेश काळोखे (अपक्ष)
- प्रभाग क्रमांक 8 : पूजा काळोखे (भाजप)
- प्रभाग क्रमांक 9 : स्मिता चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 10 : सुधीर काळोखे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 11 : पौर्णिमा विशाल परदेशी(राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 12 : सपना जयेश मोरे(राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 13 : प्रियांका मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 14 : प्रवीण रामदास काळोखे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग क्रमांक 15 : आदित्य चिंतामन टिळेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस)
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांसाठी काल (मंगळवारी) मतदान पार पडलं. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही मतदान पार पडलं. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरु झालं होतं. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान काल मतदान झालं. आज (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- NagarPanchayat Elections Result : बच्चूभाऊंचा 'प्रहार'! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का
- Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी
- Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू!
- Nanded Nagar Panchayat Election : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची बाजी, दोन नगरपंचायतींवर काँग्रेस तर एका ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता