Yavatmal Crime News : विवाहितेची पतीकडून निर्घृण हत्या; डायल 112 वरील तक्रारीमुळे फुटले बिंग
Yavatmal Crime News: किरकोळ वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या करत खोटा बनाव रचला. मात्र मृत्यू संशयास्पद वाटलाने डायल 112 वरील तक्रार केली असता या हत्येमागील सत्य समोर आले आहे.
Yavatmal Crime News : यवतमाळ येथील जामनकर नगरातील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच पतीसह नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्नही केला. मात्र डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी (Yavatmal Police)अंत्ययात्रा थांबवून पंचनामा केला असता, या विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस (Police) तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी पतीला पोलिसांनी (Yavatmal Crime) ताब्यात घेतले आहे. दिपाली मिश्रा (28, रा. जामनकरनगर) असे मृत महिलेचे, तर महेश जनार्दन मिश्रा (34) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. या बाबत रत्नकला शंकर तिवारी (72, रा. वारज, ता. दारव्हा) यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाचे बिंग फुटले आहे.
डायल 112 वरील तक्रारीमुळे फुटले बिंग
घरगुती कारणातून संशयित आरोपी पती आणि मृत दिपाली मिश्रा यांच्यात कायम वाद होत होता. दरम्यान हा वाद विकोपाला गेल्याने पती महेशने दिपालीचा गळा आवळून खून केला. मात्र त्यानंतर घाबरलेल्य महेशने हे कृत्य लपवण्यासाठी दीपालीचा झोपेतच मृत्यू झाला असल्याचा बनाव करत ही माहिती परिसरातील नागरिकांना तसेच नातेवाईकांना दिली. त्यानंतर दीपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र हा प्रकार संशयास्पद असल्याने एका नागरिकाने डायल 112 या क्रमांकावरून संपर्क करीत पोलिसांकडे शंका व्यक्त केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी पथकासह महेश मिश्रा याच्या घराकडे धाव घेतली. मात्र तेथे कोणीही आढळले नाही. त्यानंतर परिसरात विचारपूस केली असता अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी ही अंत्ययात्रा बाजोरिया नगर येथे थांबवून दीपालीचा मृतदेह ताब्यात घेतला.
शवविच्छेदन अहवालानंतर सत्य आले समोर
दीपालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे तपासण्यासाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आणि उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात दीपालीचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे तसेच गळा आवळल्यानंतर श्वसननलिका डॅमेज झाली होती, असा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.
या अहवालच्या माध्यमातून या हत्येचे सत्य समोर आले आणि पती महेशच्या कृत्याचे बिंग फुटले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ मारेकरी महेशला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर किरकोळ भांडणातून पती महेशने दीपालीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी दीपालीच्या आजी रत्नकला शंकर तिवारी (रा. वारज पोतिवसा तादारव्हा) यांच्या तक्रारीवरून महेश विरुद्ध कलम 302 भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या