एक्स्प्लोर

यशवंत सिन्हांना मुख्यमंत्र्यांचा फोन

शेतीमालाला हमीभाव मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी सिन्हा यांनी सोमवारपासून अकोल्यात आंदोलन सुरु केलं आहे.

अकोला: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिन्हा यांना फोन करुन, त्यांच्याशी बातचीत केली. शेतीमालाला हमीभाव मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी सिन्हा यांनी सोमवारपासून अकोल्यात आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून अकोला पोलीस मैदानात यशवंत सिन्हा आणि शेतकरी ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. आज भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी यासारखी मंडळीही यशवंत सिन्हांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार आहेत. एकीकडे भाजपचेच ज्येष्ठ नेते सरकारविरोधात रस्त्यावर आले असताना दुसरीकडे विरोधकांनीही यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे अकोल्यातील आंदोलनाचा वाढता प्रतिसाद सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत. यशवंत सिन्हांचं आंदोलन केंद्र सरकार असो वा राज्य सरकार दोघांनीही सत्तेवर येण्यापूर्वी शेतकर्‍यांना विविध आश्वासणे दिली.पण त्यातील एकही आश्वासन दोन्ही सरकारांनी पूर्ण केले नाही, असा आरोप करत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात जनआंदोलन सुरु केलं. यशवंत सिन्हा यांनी सरकारकडे एकूण सात मागण्या केल्या होत्या. आंदोलकांच्या सातपैकी सहा मागण्या सककारकडून मान्य करणात आल्या आहेत. मात्र नाफेडने शेतमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक अजूनही ठाम आहेत. महत्त्वाच्या मागण्या 1) शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाची नाफेडनं किमान हमीभावानं खरेदी करावी. 2)  बोंडअळीग्रस्त कापूस शेतकऱ्यांचं तातडीने सर्वेक्षण करून एकरी ५० हजारांची मदत द्यावी. यशवंत सिन्हा ताब्यात आणि सुटका दरम्यान, या आंदोलना दरम्यान यशवंत सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मागण्यांच्या पूर्ततेसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर समाधानी नसल्याचं सांगत यशवंत सिन्हांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनावर यशवंत सिन्हा ठाम अकोल्यात आंदोलन छेडल्यानंतर पोलिसांनी सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारीही दाखवली. मात्र, त्यांनी नकार देत झाडाखाली झोपणं पसंत केलं. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम आहेत. स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात पीएशी बोला, फडणवीसांचा सिन्हांना निरोप : पटोले यादरम्यान यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांनी फोनवर येणं टाळून सिन्हांना पीएशी बोला असा निरोप दिला. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच डावलल्याची भावना आहे, असा आरोप भाजपचे गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे. तर वरुण गांधी, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा अकोल्यात! दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अकोला पोलिस मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या यशवंत सिन्हा यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा आणि वरुण गांधी पाठिंब्यासाठी थेट अकोल्यात येणार आहेत. खासदार नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. यशवंत सिन्हांची उद्धव ठाकरे आणि पवारांशी फोनवर चर्चा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकाविरोधात अकोल्यात आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण करु, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे.  काँग्रेसचा पाठिंबा दरम्यान, यशवंत सिन्हा यांच्या या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. देशाच्या एका माजी अर्थमंत्र्यांना पोलिस गाडीत बसवून नेणं हे कृत्य अशोभनीय असल्याचं चव्हाण म्हणाले. संबंधित बातम्या यशवंत सिन्हांची उद्धव ठाकरे आणि पवारांशी फोनवर चर्चा स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget