पाणीटंचाईच्या झळा : गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या मजुरांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू
गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या धडपडीत दोघांचा गेला जीव. 72 वर्षांपूर्वीच्या विहिरीत आक्सिजन अभावी दोन जणांचा मृत्यू झालाय.
लातूर : पाणीपुरवठा योजनेकडे झालेले दुर्लक्ष आणि ग्रामपंचायतीचा त्यातून उपाय शोधण्याचा प्रयास दोन मजुरांच्या जीवावर बेतला आहे. पाणी टंचाईच्या झळा भासू लागल्याने 72 वर्ष जुन्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची दुर्घटना जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे घडली आहे.
वांजरवाडा गावातील जुन्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम महाळ हिप्परगा येथील मजुरांनी घेतले होते. पण विहिरीत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मारुती पवार व परमेश्वर केंद्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वांजरवाडा जळकोट तालुक्यातील अडीच हजार लोकवस्ती असलेलं गाव. जिल्हा परिषदेचा गट आणि गण असतानाही या गावात पाणीटंचाईच्या झळा ह्या कायम होत्या. गावचा पाणीप्रश्न मार्गी लागावा याकरिता 19952 साली गोविंद माऊली मंदिराच्या मागे 72 फूट खोलीची विहीर खोदण्यात आली आहे. मात्र, काळाच्या ओघात गावाला नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता 52 खेडी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.
धक्कादायक! होम क्वारंटाईन होण्यावरुन वाद, लातूरच्या निलंग्यात दोघांची हत्या
इतर दोन मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरू
हाळीच्या तळ्यावरून गावाला पाणीपुरवठा देखील होत होता. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा ह्या ठरलेल्याच. त्यामुळे नियमित पाणी मिळत नसल्याने ह्या जुन्या विहिरीचे खोदकाम करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला. महाळ हिप्परगा येथील मजुरांनी हे गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. पण बऱ्याच वर्षांपासून विहिरीतील गाळ काढण्यात आला नव्हता तर मृत झालेले पशु गावची घाण याच विहिरीत टाकली जात होती. अखेर गाळ काढण्यासाठी मारुती बापूराव पवार (30) व परमेश्वर गणपती केंद्रे (29) हे उतरले होते. मात्र, विहिरीतील घाण आणि अरुंद विहिरीत त्यांना ऑक्सिजन मिळाला नसल्याने ते बेशुद्ध झाले तर इतर दोन मजुरांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. मात्र, ऑक्सिजन अभावी मारुती आणि परमेश्वर यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन मजुरांवर उपचार सुरू आहेत.
CM Uddhav Thackrey | 31 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले