एक्स्प्लोर
women's day : 21 आदिवासी महिला होणार एसटी ड्रायव्हर
राज्यात पहिल्यांदाच आदिवासीबहुल भागातील मुलींना आणि महिलांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहनचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

यवतमाळ : राज्यात पहिल्यांदाच आदिवासीबहुल भागातील मुलींना आणि महिलांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहनचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुली आणि महिलांचा जागतिक महिला दिनी यवतमाळ येथील राज्य परिवहन विभागाच्या कार्यालयात केक कापून, रोपटे आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. परिवहन विभागाचे अधिकारी आणि सकाळ तनिष्का ग्रुपच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात पहिल्यांदाच अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांची चालक म्हणून निवड झाली आहे. या सर्व महिला आता प्रवाशांना सुरक्षित आणि सुखरूप प्रवासाची हमी देत आहेत. या महिलांचे गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण सुरु आहे. त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असून येत्या 15 दिवसांत या महिला एसटीमध्ये चालक म्हणून रुजु होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी वाचा























