एक्स्प्लोर
Ganpati visarjan 2025:अगले बरस तुझको आना ही होगा..! लाडक्या बाप्पाच्या निरोपाचा उत्साह शिगेला, गिरगाव चौपाटीला भक्तांचा महासागर
गेल्या 18 तासांपासून अधिक काळ लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु होती. अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून विसर्जनासाठी सज्ज झाला आहे.
Ganpati visarjan 2025
1/7

Ganpati visarjan 2025: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे काल (6 सप्टेंबर 2025) अनंत चतुदर्शीला दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आपल्या गावी निघाले आहेत. राज्यभरात अजूनही विसर्जन सोहळ्याची (Ganesh immersion 2025) धामधूम बघायला मिळत आहे. सध्या लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.
2/7

गेल्या 18 तासांपासून अधिक काळ लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु होती. अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. शिवाय यंदा मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा वापरण्यात येणार आहे.
3/7

दरम्यान, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी देशभरातून दाखल गणेश भक्तांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली असून सर्वत्र भक्तीचा महासागर बघायला मिळतो आहे.
4/7

आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मध्यरात्री तुफान गर्दी बघायला मिळाली. मध्यरात्री मुंबई शहरात जोरदार पाऊस होऊन गेलाय. मात्र या जोरदार पावसामध्येसुद्धा गणेश भक्तांकडून मोठा उत्साहात राजाचा विसर्जन केलं जात असल्याचे चित्र आहे.
5/7

. मुंबईतील अनेक ठिकाणी अद्याप सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी आहे. मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात मोठ्या गणपतींची रिघ लागली आहे. मुंबईत सध्या गणेश विसर्जनाचा सोहळा शिगेला पोहोचला असून संपूर्ण गिरगाव चौपाटीवर भक्तीचा जनसागर लोटला आहे.
6/7

राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त चौपाटीवर दाखल होत असून अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जनाचा हा महासोहळा इथे पार पडतोय.
7/7

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या जवळ पोहोचला. लालबागचा राजाच्या रथावर अनंत अंबानी हेदेखील उपस्थित आहेत. लालबागचा राजाला पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी आहे.
Published at : 07 Sep 2025 08:42 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























