पाऊस की उघडीप! पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) सुरु आहे तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) सुरु आहे तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत, धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील हवामान (Weather) कसं असेल? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. पुढील पाच दिवस राज्यात उघडीप राहणार असल्याचे खुळे म्हणाले.
उघडीप
संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांत आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर पर्यंत पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात व विदर्भात मात्र ही उघडीप परवा मंगळवार दिनांक 9 सप्टेंबरपासून जाणवेल असे खुळे म्हणाले.
12 सप्टेंबरपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ, खान्देश व नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या 21 जिल्ह्यांत शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील 15 जिल्ह्यात मात्र ह्या दिवसात केवळ तुरळक ठिकाणी मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.
पुढील काळात वातावरणात मोठे बदल होणार
राज्यातील काही भागात ढगाळ हवामान आणि किरकोळ भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. खास करून उत्तर महाराष्ट्र विभागात काही भागात पाऊस होईल इतर ठिकाणी किरकोळ हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून राज्यातील बहुतांश भागात सूर्य प्रकाश मिळेल हवेची दिशा राज्यात काही भागात उत्तरे कडून होईल . पुढील काळात वातावरणात मोठे बदल सतत होत राहतील.
दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. विशेषत: मराठवाडा आणि विदर्बला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. तसेच अनेक घरांचे देखील नुकसान झालं होते. अनेकांची जनावरे देखील दगावली होती. काही भागात जीवितहानी देेखील झाली होती. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:























