एक्स्प्लोर
तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना खडसे अडखळले...
“जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत, सुटले पाहिजेत, ही भावना आहे. अजित पवार बरोबर येतात की कुणी येतात, हा प्रश्न नाही. जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत.”
नागपूर : तब्येतीच्या कारणास्तव रेशिमबाग स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला अनुपस्थित राहिल्याचं कारण माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी दिलं. यावेळी, मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मात्र एकनाथ खडसे काहीसे अडखळले.
....आणि खडसे अडखळले!
तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहात का?, या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ खडसे काहीसे अडखळले. ते म्हणाले, "मी भाजपचा कार्यकर्ता आहे. कुणा एका व्यक्तीचा माणूस नाही. त्यामुळे भाजपसोबत मी आजही आहे, उद्याही भारतीय जनता पार्टीबरोबरच राहण्याचा...अ..अ..अ... राहीनच."
संघाच्या वर्गाला खडसे का अनुपस्थित राहिले?
“तब्येतीच्या कारणास्तव मी संघाच्या वर्गाला गेलो नाही. तसे भाऊसाहेब फुंडकर आणि आमच्या आमदारांनी तिथे कळवलंही होतं.”, असे स्पष्टीकरण खडसेंनी दिले. शिवाय, “नोटीस देण्यातबाबत पक्षातून कुणीच म्हटलं नाही आणि संघ काही असे नोटीस वगैरे कुणाला देत नाही. माझ्या अनुभवानुसार, संघाने नोटीस देऊन भाजपमध्ये हस्तक्षेप केल्याचं एकही उदाहरण नाही. आमदार राज पुरोहित यांनीही असे म्हटलेलं नाही.”
अजित पवार विधानसभेत खडसेंच्या समर्थनार्थ उतरताना दिसतात, यावर खडसेंना विचारले असता, ते म्हणाले, “जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत, सुटले पाहिजेत, ही भावना आहे. अजित पवार बरोबर येतात की कुणी येतात, हा प्रश्न नाही. जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत.”
खडसे नाराज आहेत का?
“आजतागायत सत्तेसाठी कधीच काम केले नाही. पक्ष वाढला पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी काम करत आलो आहे. जे केवळ सत्तेसाठी येतात, ज्यांना केवळ सत्ताच हवी असते, ते इकडू-तिकडे येतात, इकडून तिकडे जातात. ज्याला प्रामाणिक राहायचं आहे, तिथे नाराजीचा विषयच येऊ शकत नाही.”, असे खडसे म्हणाले.
कुठल्या पक्षातून खडसेंना ऑफर?
काँग्रेसकडून ऑफरवर बोलताना खडसे म्हणाले, "40 वर्षे राजकारणात आहे. त्यामुळे मी हवाहवासा माणूस आहे. सगळ्यांना वाटतं, नाथाभाऊ आपल्यासोबत असावे. राष्ट्रवादी पण बोलावते. मित्रत्त्वाच्या नात्याने बोलतात. कधी गंमतीने, तर कधी सिरियसली बोलतात. माझे कार्यकर्तेही सांगतात, किती दिवस अपमान सहन करायचा, किती छळ सोसायचा. चूक असेल तर शिक्षा झाली पाहिजे. माझेही असे मत आहे की, सत्य असेल तर बाहेर यावं. मी कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेले नाही. मात्र कुणीही आरोप करायचे आणि चौकशी करायची, हे बरोबर नाही."
VIDEO : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंची संपूर्ण मुलाखत :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement