एक्स्प्लोर
साताऱ्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
या प्रकरणात सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आणखी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
सातारा : हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली. या प्रकरणात सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
आनंद कांबळे आणि पत्नी दिक्षा कांबळे हे नवदाम्पत्य हनीमूनसाठी पुण्यातून महाबळेश्वरला निघाले. पसरनी घाटात थांबल्यानंतर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पतीवर कोयत्याने वार केले, ज्यात आनंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटणा लुटमारीतून घडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला गेला. यात नवविवाहिता दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हल्लेखोरांनी लंपास केलं. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र गुन्हे अन्वेशण विभागाच्या पथकाने शिताफिने तपास करुन पत्नी दिक्षाला बोलतं केलं आणि ही खळबळजनक घटना उजेडात आली.
कट कसा रचला?
दिक्षाचे पुणे येथील नितीन मळेकर या युवकासोबत प्रेमसंबध होते. लग्नाला घरातील लोकांकडून विरोध असल्यामुळे तिने घरातील लोकांच्या मर्जीने नातेसंबधातील आनंद कांबळे याच्यासोबत 26 मे रोजी विवाह केला. हे नवदाम्पत्य महाबळेश्वरला हनीमूनसाठी निघालं होतं.
महाबळेश्वरला जाताना दिक्षाने पसरनी घाटात उलटी होत असल्याचं नाटक करुन पतीला गाडी थांबवण्यास सांगितलं. त्याच वेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन युवकांनी कोयत्याने आनंदवर सुमारे दहा ते बारा वार केले आणि जाताना दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून नेलं.
जखमी झालेल्या आनंदला साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आलं. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. पोलीस तपासात दिक्षा आणि तिचा पूर्वीचा प्रियकर नितीन मळेकर या दोघांना अटक करण्यात आली. ज्यांनी हा हल्ला केला ते दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement