एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सांगलीत पत्नीकडून पतीची गळा चिरुन हत्या, आत्महत्येचा बनाव उघडकीस

पतीच्या आजारपणाला कंटाळून आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीने पतीची गळा चिरुन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सांगली : पतीच्या आजारपणाला कंटाळून आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीने पतीची गळा चिरुन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीच्या तासगावमध्ये हा खुनाचा प्रकार घडला असून पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. सांगलीच्या तासगावमधील इंदिरानगरमध्ये पतीचा खून करून आत्महत्येचा केलेला बनाव तासगाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्लापा उर्फ कल्लू शिवाजी बागडी (40)या व्यक्तीचा त्याच्याच पत्नीने गळा चिरुन खून केला आहे. कल्लापा याला क्षयरोग होता, तसेच कल्लापा त्याची पत्नी शांताबाई बागडी हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे शांताबाईने रागाच्या भरात हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही वर्षांपासून कल्लू बागडी क्षयरोगाने त्रस्त होता. त्यातून त्यांची सतत चिडचिड होत होती. याच चिडचिडीतून तो पत्नी शांताबाई हिच्यावर चारित्र्यावरुन संशय घेत होता. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली. यावेळी "मी आत्महत्या करतो", असे सांगून घरातील चाकूसारखे धारदार शस्त्र घेऊन कल्लू घरातून बाहेर पडला. घराच्या मागे असणार्‍या खोलीत गेला. त्यावेळी पत्नी शांताबाईही त्याठिकाणी आली. कल्लूने चाकू गळ्याला लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. यावेळी शांताबाईने "तू कशाला मरतो, मीच तुला मारते", असे म्हणून चाकू धरण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कल्लूच्या गळ्याला चाकू लागला आणि कल्लू रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी शांताबाईने आणखी एकदा त्याच ठिकाणी चाकूने जोरदार वार केला. ज्यामध्ये कल्लूचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सकाळी शांताबाईने आरडाओरड करुन नवरा सापडत नसल्याची आवई उठवली. त्यानंतर काही वेळाने घराच्या मागील खोलीत नवरा मरुन पडला असल्याचे दिसून आल्याचे नाटक केले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास शांताबाई हिने स्वतः पोलिसांत जाऊन नवर्‍याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली. परंतु पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला. ज्यामध्ये घटनास्थळावरील वातावरण व परिस्थिती पाहता पोलिसांना खुनाची शंका आल्याने शांताबाई हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. दरम्यान आपणच खून केल्याचे शांताबाई बागडी हिने कबूल केल्याचे तासगाव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोलाMohan Bhagwat VS Asaduddin Owaisi : मोहन भागवतांच्या अपात्यसंदर्भातील वक्तव्यावर ओवैस काय म्हणाले?Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Embed widget