एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फाशीची शिक्षा का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात दिलेली 13 कारणं!
तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे न्यायलयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
अहमदनगर : ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची सुनावणी आज पूर्ण झाली. या खटल्याचा निकाल आता येत्या 29 नोव्हेंबरला लागणार आहे.
महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे 29 नोव्हेंबर 2017 रोजी समजणार आहे.
तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे न्यायलयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
दोषींना फाशी का यासाठी न्यायालयात 13 कारणं दिल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली. ती कारणं म्हणजे....
1. मुख्य दोषी जितेंद्र शिंदे याच्या गळ्यात आणि हातात एक माळ होती. ती लकी असल्याचे त्याने वीट भट्टीवर काम करताना मालकाला सांगितलं होतं. घटनास्थळी त्या माळेचे मणी मिळाले.
2. दोषीची दुचाकी आढळली.
3. दोषी जितेंद्र शिंदेंच्या पॅन्टवर, शर्टवर मुलीचे डीएनए आढळले. दोषीने ते पॅन्टवर पुसलं होते.
4. दोषी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी शिंदेची दुचाकी पळून जाण्यासाठी ठेवली होती.
5. पीडितेच्या गुप्तांगाचा स्राव जितेंद्र शिंदेंच्या पॅन्टवर आढळला
6. अत्याचार आणि खून केल्यानंतर पीडितेला खांद्यावर टाकून घेऊन जात असताना तिच्या तोंडातील रक्त दोषी शिंदेच्या शर्टवर पडलं. त्याने शर्ट धुतला, पण बनियनच्या आतील बाजूस रक्त सापडलं
7. पीडितेच्या शरीराचे दोषीने लचके तोडले होते, शिंदेच्या दाताचे ठसे पीडितेच्या शरीरावर मिळाले
8. दोषीच्या नखात पीडितेच्या शरीराचा भाग मिळाला.
9. दोषीच्या चपला घटनास्थळी मिळाल्या.
10. शिंदेने दोषी क्रमांक 3 ला या घटनेनंतर मिस कॉल देऊन संकेत दिला होता
11. घटनास्थळाजवळ तिघे फिरत होते
12. दोषी एक आणि तीनने पीडितेची एक दिवस आधी छेडछाड केली होती
13. पीडितेचे कपडे चारीच्या दक्षिण दिशेला आणि मृतदेह उत्तर दिशेला आढळला. शिंदे हे एकटा करणं अशक्य आहे. वक्ष, पाठीवर चावा घेतल्याचा उल्लेख वैद्यकीय अहवालात आहे. दोन्ही हात खांद्यापासून निखळले होते. गुप्तांगावर जखमा होत्या.
काय घडलं न्यायालयात?
- आरोपी क्रमांक २ संतोष भवाळ यांच्या शिक्षेवरील युक्तीवादाला ऍड. बाळासाहेब खोपडे यांच्याकडून सुरूवात...
- आरोपीनं कोणताही गुन्हा केला नाही, दिशाभूल करणारे पुरावे सादर करत आरोपीला गोवल्याचा दावा
- आरोपी २ ला फाशी देण्याइतपत पुरावे नाहीत, असा खोपडेंचा युक्तिवाद
- लोकांची मागणी आणि माध्यमातील बातम्या यावर न्यायालय प्रभावित होत असल्याचा आरोप, न्यायालयाने यावर आक्षेप घेत, पुराव्यांशिवाय आरोप करु नका, असं सुनावलं
- उज्ज्वल निकम यांच्या युक्तीवादाला सुरुवात
- खून का बदला खून नको, आम्हाला न्याय हवा, असं म्हणत युक्तीवादाला सुरुवात...
- कृत्य अत्यंत अमानवी असल्याचं सांगत, आरोपी मनुष्य नाहीत.
- खून करणं हे त्यांनी एन्जॉय केलं, त्यामुळे कोणताही गुन्हेगार शिक्षेशिवाय सुटू नये.
- लोक आक्रोश करतात, त्यांना न्याय मिळावा, ही आमची भूमिका.
- सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खटल्याच्या निकालांचा संदर्भ दिला.
- इंदिरा गांधी खून खटला, अफजल गुरु प्रकरण आणि बच्चन सिंग प्रकरण आदी प्रकरणांचा संदर्भ
- कोपर्डीचं कृत्य, भयानकता, क्रूरता आणि विकृत मानसिकतेचा कळस असल्याचं सांगत 13 मुद्दे मांडले
- या मुद्द्यांच्या आधारावर तिन्ही आरोपींना मृत्युदंडाची मागणी.
- हे आरोपी म्हणजे राक्षसांचा पुनर्जन्म आहे.
- संपूर्ण घटनाक्रम हा गोठलेल्या रक्ताच्या गुन्हेगारांनी केलाय.
- आरोपी एकला मदत करणारे दोघेही तितकेच जबाबदार.
उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद
- 11 जुलैला आरोपींनी पीडितेला अडवलं. आरोपी जितेंद्र शिंदेनं हात ओढून अत्याचारासाठी चारीकडे खेचलं. यावेळी मैत्रीण रडली.
यावेळी आरोपी भवाळ आणि नितीन भैलुमे हसत होते.
- निशस्त्र मुलीला हसून ओढतात. त्यामुळं शिंदेच्या कृतीचा भवाळ आणि नितीन भैलूमे आनंद घेत होते.
- नागरिक येण्याच्या भितीनं दोघांनी आपलं काम तीला नंतर दाखवू, असं शिंदेला म्हटलं. म्हणजेच आपण दोघे नंतर अत्याचार करु हा अर्थ होतो.
- त्यानंतर पीडित तरुणी दोन दिवसांनी 13 जुलैला सायंकाळी आजोबाकडे दुचाकीवरुन जात होती. यावेळी आरोपी दुचाकीवरुन लक्ष ठेवत होते.
- घराबाहेर गेलेली मुलगी घरी लवकर न आल्यानं आई पहायला निघाली. त्यावेळी पीडीत विवस्त्र पडली होती आणि त्यावेळी शिंदे पळून गेला. यापूर्वी भवाळ आणि नितीन भैलूमे यांनी आरोपी शिंदेला पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.
- तीन आरोपी मनोरुग्ण नव्हते. तीन आरोपी प्रौढ होते त्यांना कृत्याची जाणीव होती. त्यामुळं आरोपींना कमी शिक्षा दिल्यास समाजात तो पुन्हा असं करणार नाही याची खात्री नाही.
- त्यामुळे दोषी ठरवल्यामुळे त्यांना पश्चाताप आणि दुःख नाही, आरोपी जितेंद्र शिंदे कमी शिक्षेची मागणी केली नाही. त्यामुळं जन्मठेपने सुधारणार नाही. शिंदेनं शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस काय असं म्हटलंय.
- त्याचबरोबर भवाळ आणि नितीन भैलूमे यांना पश्चाताप नाही. कमी शिक्षा दिल्यास सुधारणा होईल का हा प्रश्न आहे.
- 13 जुलैला घटनेवेळी आरोपी शिंदेनं दोघांना भवाळ आणि नितीन भैलूमे यांना मोबाईल फोनवर मिस्ड कॉल केला होता. यावेळी भवाळ आणि नितीन भैलूमे नं उत्तर दिले नाही.
- 13 तारखेला आरोपी सात वाजता चकरा मारत होते तर त्यानंतर आत्याचार झाला आणि नंतर मिस्ड कॉल केलाय.
आरोपी शिंदेचं माळ घटनास्थळी सापडली.
- यांचं भविष्यात पुनर्वसन होण्याची शक्यता कमी आहे. तीनही आरोपींनी क्रूरपणे आत्याचार आणि हत्या केली. ही विकृती आहे. त्यामुळं जितेंद्र शिंदेला फाशी शिक्षा देण्याची मागणी
- तर संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे यांना बलात्कार करण्याची इच्छा होती. त्यामुळं दोघांनी कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केली. त्यामुळं या दोघांना फाशीची मागणी
- तिघांना आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची उज्ज्वल निकम यांची मागणी केली
बाळासाहेब खोपडे यांचा युक्तीवाद
- घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणतासाही सामाजित दबाव नसावा.
- संतोष भवाळनं गुन्हा केलेला नाही, तरीही पुरावा आणून आरोपी दोषी ठरवला गेला.
- शिवाय घटनेवेळी २ आणि ३ क्रमांकाच्या आरोपीला कुणीही घटनास्थळावरुन पळून जाताना पाहिलेलं नाही, म्हणून संतोष भवाळवर ३०२ कलमाची शिक्षा लागू होत नाही
- या प्रकरणी रेअरेस्ट ऑफ रेअर असं यात काय घडलं? दिसला फिरला म्हणून कट करुन हत्या असं होत नाही. शिक्षा दिली तर समाजात ऐकोपा होईल का, तसं असेल तर मी फाशी मागेन. फाशी साठी पुरावा नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement