Mauris Noronha : कथित मॉरीस भाई नेमका कोणाचा? सत्तापिपासू राजकारणात सर्वपक्षीय आठवण ठेवून गेला!
रोहित साहू मोरीसचा साथीदाराचे शिवसेना शिंदे गटाचे सिद्धेश कदम यांच्यासोबत पोस्टर्सवर फोटो आहेत. भाजप आमदार सुनील राणे, आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत अनेक फोटोंमध्ये, बॅनरवर मॉरिस पाहायला मिळतो.
![Mauris Noronha : कथित मॉरीस भाई नेमका कोणाचा? सत्तापिपासू राजकारणात सर्वपक्षीय आठवण ठेवून गेला! Who exactly is the alleged Mauris Noronha who is All parties remembered in power hungry politics bjp shivsena thackeray faction Mauris Noronha : कथित मॉरीस भाई नेमका कोणाचा? सत्तापिपासू राजकारणात सर्वपक्षीय आठवण ठेवून गेला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/493fff513a7ce306081dd1871f494bc71707497031482736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कथित भाई म्हणून वावरत असलेल्या मॉरिस नोरोन्हाने (Mauris Noronha) त्याच्याच कार्यालयात अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. यानंतर ठाकरे गटाकडून राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून हल्ला करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मॉरिसचे ठाकरे गटातील नेत्यांसोबतचे फोटो पत्रकार परिषद घेऊन समोर आणले. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा मॉरीस आणि त्याचा साथीदार साहू यांची पोस्टर्स फोटो समोर आणले आहेत. ज्यामध्ये मॉरिस हा भाजपच्या नेत्यांसोबत सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे हा कथित मॉरीस भाई नेमका कोणाचा? असा प्रश्न पडला आहे.
सर्वपक्षीय मारण्याची आठवण ठेवून गेला!
रोहित साहू मोरीसचा साथीदाराचे शिवसेना शिंदे गटाचे सिद्धेश कदम यांच्यासोबत पोस्टर्सवर फोटो आहेत. भाजप आमदार सुनील राणे, आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत अनेक फोटोंमध्ये, बॅनरवर मॉरिस पाहायला मिळतो. सोबतच अनेक पोस्टर्सवर सुनील राणे यांच्यासोबत सुद्धा मॉरिसचे फोटो आहेत. त्यामुळे सुडाच्या भावनेनं पेटलेल्या माॅरिस राजकारणात प्रवेश करण्यासाठी साम, दाम, दंड भेदचा वापर केला होता का? अशी शंका येऊ लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)