एक्स्प्लोर

हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल; सुप्रिया सुळेंनी स्टेटसमधून व्यक्त केल्या भावना

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व्हॉट्सअॅप स्टेटसमधून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मुंबई - अजित पवारांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. अजित पवारांच्या बंडोखोरीमुळं पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे बहिण सुप्रिया सुळेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ही घटना समजल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसला एक पोस्ट केलं होतं. यात पक्ष आणि कुटुंबाचं विभाजन असं त्यात लिहलं होतं. त्यानंतर आजही विविध संदेश त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवले आहेत. पहिल्या स्टेटसमध्ये त्यांनी शरद पवारांचा साताऱ्यातील पावसात केलेल्या भाषणाचा फोटो टाकला आहे, यात लिहिलं आहे की, हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल. त्याचसोबत यापुढे पुन्हा मजबूत संघटनेची पुनर्बांधणी करून लोकांची सेवा करू, आमच्याकडे सर्वोत्कृष्ट आदर्श नेतृत्व आहे, आम्ही प्रामाणिकपणे आणि सन्मानाने, मेहनतीने पुढे जाऊ असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळे यांचे काही स्टेटस - "तुम्ही जीवनात कोणावर विश्वास ठेवता?, आयुष्यात असं फसवल्याची भावना यापूर्वी कधी वाटली नाही. ज्यांना पाठिंबा दिला. प्रेम दिलं, त्या बदल्यात त्यांनी आपल्याला काय दिलं.?' असे भावनिक स्टेट्सही त्यांनी ठेवलं होते. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण-भावाचे खूप जवळचे आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगात सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजित पवारांची पाठराखण केली आहे. "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु असून हा मला अधिक मजबूत करेल. यातून प्रत्येकजण लवकर बाहेर पडेल", असंही त्यांनी लिहलयं. "चांगले विचार नेहमी विजयी होतात, प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही, हा मार्ग अवघड असतो, मात्र तोच शाश्वत आहे". उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - दरम्यान, सत्तेच्या खेळात कुटुंबात फाटाफूट नको, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे...असं भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळेंनी काल केलं होतं. 'आपल्या पवार कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास राज्यातील जनतेला माहित आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे आणि परत ये.', अशी भावनिक साद सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना घातली होती. संबंधित बातम्या - अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर अचंबित, म्हणाले... बहुमताचा दावा करणारं आणि सरकारस्थापनेचं निमंत्रण पत्र सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्त्यांना आदेश एक मेख अशीही... Supriya Sule to Ajit Pawar | "काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget