एक्स्प्लोर

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर अचंबित, म्हणाले...

अजित पवारांनी सहज नाही तर सर्व विचारांती हा निर्णय घेतला असणार. आज लोकांच्या भावना स्फोटक असतील पण हळू हळू कमी होतील, असेही पडळकर म्हणाले.

मुंबई : अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर अचंबित, म्हणाले...राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला. यामध्ये एक व्यक्ती तथा नेते असेही आहेत ज्यांनी भाजपकडून अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते म्हणजे गोपीचंद पडळकर. वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'ढाण्या वाघ' गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला होता. आता अजित पवारांनीच भाजपसोबत गट्टी करत सरकार स्थापन केल्याने पडळकर यांना देखील आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. एबीपी माझाशी बोलताना पडळकर म्हणाले की, अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाहिल्यावर धक्का बसला पण तो सुखद धक्का होता. पण जे झालं ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे. अजित पवारांचा भाजपमध्ये येण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे ते म्हणाले. मात्र निवडणूक लढतांना असं काही होईल असा अजिबात अंदाज नव्हता. तसेच शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ शकेल हे ही कधी वाटलं नव्हतं, असे देखील पडळकर म्हणाले. राजकारणात काहीही घडू शकतं हे यावरुन सिद्ध झालं आहे. मी प्रवासात असताना घाटात होतो. त्यावेळीस फोन आले की शपथविधी सुरू आहे. तेव्हा फोनवर शपथविधी पहिला, असे त्यांनी सांगितले. बारामतीतल्या मतदारांचा विश्वासघात नाही तर त्यांना स्थिर सरकार देण्यासाठीच अजित पवारांनी असा निर्णय घेतला असेल, असेही ते म्हणाले. अजित पवारांनी सहज नाही तर सर्व विचारांती हा निर्णय घेतला असणार. आज लोकांच्या भावना स्फोटक असतील पण हळू हळू कमी होतील, असेही पडळकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 66 हजारांनी त्यांचा पराभव केला होता. निवडणुकीत पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यानंतर "आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल" अशा आशयाचे मजकूर छापलेले फलक देखील बारामतीत लावण्यात आले होते. तसेच विजयानंतर अजित पवार म्हणाले होते की, मुख्यमंत्री बारातमतीत येऊन म्हणाले होते की गोपीचंद पडळकर आमचा ढाण्या वाघ आहे. मात्र आता त्या ढाण्या वाघाचं मांजर झालंय का बघावं, असा टोला अजित पवारांनी लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget