एक्स्प्लोर

श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?

मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी बोलतात, पण त्यांच्या वचननाम्यात मराठीचा उल्लेख नाही. त्यांचं मराठीवरचं प्रेम हे  पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका शिंदे यांनी केली. 

Eknath Shinde on Thackeray Brothers: मुंबईत महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचं आहे. हा मुंबईकर इकडे वसई-विरार, बदलापूर-वांगणीपर्यंत गेला त्याला जबाबदार कोण? जे मुंबई महापालिकेत सत्तेत होते. त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतील, असे शिंदे म्हणाले. त्यांनी खिचडीमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, मिठी नदीत पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले आणि अगदी कफन घोटाळाही केला. रस्त्याच्या डामरामध्ये पैसे खाणारे आता कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत. मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी बोलतात, पण त्यांच्या वचननाम्यात मराठीचा उल्लेख नाही. त्यांचं मराठीवरचं प्रेम हे  पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका शिंदे यांनी केली. 

श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे

शिंदे म्हणाले की, झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होतं. मागच्या अनेक वर्षांमध्ये त्यावर काहीच झालं नाही. जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची, आम्ही महायुतीने हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. आम्ही इतरांचं श्रेय वगैरे काही चोरणारे लोक नाही, ती श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे. आम्ही केलेल्या कामाचं आता श्रेय घेऊ लागलेत. खरं म्हणजे कामचोर टोळी कोण आहे ते बघा. ते म्हणाले की, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर सातत्याने टीका करतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. पण मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला तो तुमच्यामुळेच गेलाय. उलट प्रधानमंत्र्यांनी मुंबईला फिनटेक सिटी करण्याचा निर्धार केला आहे.

वचननामा म्हणजे फक्त 'टोमणेनामा', 'घोटाळेनामा'

गेली 25 वर्ष फक्त अंडरस्टँडिंगसाठी रखडलेले एसटीपी (STP) चे प्रकल्प त्यांनी केले नाहीत. जी कामे 25 वर्षात झाली नाहीत ती आम्ही केली. मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावाखाली काही लोकांनी फक्त 'गाळ' (पैसा) खाल्ला. त्यांच्या वचननाम्यामध्ये साधा हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नाही. त्यांना हिंदुत्वाचा आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा विसर पडलेला आहे. त्यांचा वचननामा म्हणजे फक्त 'टोमणेनामा', 'घोटाळेनामा' आहे, आमचा मात्र 'विकासनामा' असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget