एक्स्प्लोर

दोन महिने हिंदू मुस्लीम करून जुमलानामा जाहीर केला, पण भाजपच्या 2017 च्या जाहीरनाम्यातील पूरमुक्त मुंबई, 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचं काय झाले? काँग्रेसचा हल्लाबोल

2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी त्यांनी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

Congress on Mahayuti Mumbai Manifesto: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून 2026 साठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध झाला. तब्बल दोन लाख मुंबईकरांनी दिलेल्या सूचना आणि अपेक्षांचा अभ्यास करून हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे.या वचननाम्यात मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून शहरात 20 ते 35 लाख नव्या घरांची निर्मिती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेषतः धारावी पुनर्विकास प्रकल्प डीआरपी (Dharavi Redevelopment Project) अंतर्गत राबवला जाईल आणि धारावीतील रहिवाशांना 350 चौरस फूटपर्यंतची घरे धारावीतच देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील नागरिकांवर आर्थिक बोजा वाढू नये म्हणून पुढील पाच वर्षे पाणीपट्टी वाढवली जाणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णयही या वचननाम्यात जाहीर करण्यात आला आहे.

2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी

दरम्यान, महायुतीने मुंबईसाठी वचननामा जाहीर केल्यानंतर काँग्रेसने तोफ डागली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी 2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी त्यांनी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

थेट सत्ता असताना काय केले? 

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गेले दोन महिने हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केल्यानंतर प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी महायुतीने आपला जुमलानामा जाहिर केला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी 2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी त्यांनी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न आहे. यातील काही आश्वासने आम्ही आठवण करून देत आहोत. 11लाख घरे, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले? अजून काही भाजपाच्या Highlights आम्ही लवकरच जाहिर करु...

मुख्यमंत्री जी तारीख देतात ती कधीच पूर्ण होत नाही

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री हे "सपनों के सौदागर" म्हणजे स्वप्नांचे व्यापारी आहेत. त्यामुळे सोनेरी भविष्याचे रंग दाखवताना वर्तमान किती काळा आहे हे सांगत नाहीत. त्यांच्या सर्व मुलाखतीतून भविष्यातील संकल्पना सांगतात पण आतापर्यंतची आश्वासनांचे काय झाले हे सांगत नाहीत. ईस्टर्न फ्री वे 2017 साली ठाण्याला जोडण्यात येणार होते. पूरमुक्त मुंबई 2017 साली आश्वासन होते ते आश्वासन आजही आहे. मुख्यमंत्री जी तारीख देतात ती कधीच पूर्ण होत नाही. तारीख पर तारीख हा डायलॉग मुख्यमंत्र्यांकडून घेतला असावा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलर होणार यासाठी 2019 पासून वेगवेगळ्या तारखा देत आले. अद्याप जवळपासही पोहोचलो नाही. Elevated roads चे काय झाले? बांगलादेशी-रोहिंग्या सर्वात जास्त शोधून काढले असे मुख्यमंत्री म्हणतात मग आकडेवारी जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
IndiGo Flight : पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
Embed widget