एक्स्प्लोर
डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे वाचले शंभराहून अधिक प्राण, 'महाकॅप'च्या मदतीने हृदयविकाराचा मोफत उपचार
शहरांमध्ये सहज हॉस्पिटलमध्ये जाता येतं मात्र ग्रामीण भागात ताबडतोब उपचार हवा असल्यास अनेक अडचणी उभ्या राहतात, यासाठीच गोंदियातील एका डॉक्टरने केलेला हा एक उपक्रम! एकीकडे आजची तरुणाई सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहत असताना दिसतेय तर दुसरीकडे काही उपक्रमाच्या मदतीने सोशल मीडियाचा योग्य वापर कसा केला जाऊ शकतं हे कळतंय.
गोंदिया : हृदय विकाराचा झटका आल्यानंतरचा एक तास फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे या एका तासात रुग्णाला ताबडतोब योग्य ते उपचार मिळणं गरजेचं असतं, याचाच विचार करत ग्रामीण भागात उपचारासाठी तातडीने मदत हवी असल्यास लोकांपर्यंत कशी मदत करता येईल यावर एक उपाय केला. शहरांमध्ये जवळपास प्रत्येक सिग्नलवर एक हॉस्पिटल आहे मात्र गावांमध्ये कमी प्रमाणात सोयीसुविधा असल्या कारणाने बऱ्याच त्रासांना सामोरं जावं लागतं. अशात ताबडतोब उपचार मिळणं कसं शक्य होईल, ग्रामस्थांपर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचता येईल यावर गोंदियामध्ये एक हेल्पचेन बनवण्यात आली.
गोंदियातील हृदय तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने यांनी 'महाकॅप' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला, महाराष्ट्र क्रोडियालॉजी अव्हेअरनेस प्रोग्राम असं या उपक्रमाचं नाव आहे. आदिवासी नक्षलग्रस्त भागातील 600हून अधिक डॉक्टरांना या ग्रुपमध्ये अॅड केलं आहे. रुग्णांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर ताबडतोब मदत मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर होतोय हे दिसून येतं.
डॉ. प्रमेश गायधने हे नाव केवळ गोंदियातच नाही तर संपूर्ण राज्यात आता प्रसिद्ध आहे, त्यांची कामगिरी आता राज्यभर पसरली आहे आणि त्याचं अनुकरण केलं जात आहे. त्यांचा जन्म गोंदियातील नक्षलग्रस्त गावात, आसोलीमध्ये झाला. शेतीची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या प्रमेश यांनी उच्च शिक्षण घेऊन लोकांना आरोग्यासंदर्भात मदत करण्याचा ध्यास घेतला. यवतमाळ, सोलापूर, अहमदाबादमध्ये त्यांनी मेडिकलचं संपूर्ण शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर चार वर्ष गुजरातमध्ये रुग्णालयात काम करताना आपल्या गावासाठी काहीतरूी करता यावं असा विचार त्यांनी केला आणि आपल्याच जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना सेवा देण्याचं ठरवलं.
गोंदियात परतल्यानंतर त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांना सोबत घेऊन महाकॅप नावाचा ग्रुप तयार केला , यात राज्यातील 20 हृदयरोगतज्ज्ञ असून 600 हून अधिक डॉक्टरांचा या चेनमध्ये समावेश आहे. डॉक्टरांची संख्या जास्त असल्याने 'महाकॅप 1-2-3' असे तीन ग्रुप तयार करण्यात आले. ग्रामीण भागातून आलेल्या एखाद्या व्यक्तीला छातीत दुखण्याचा त्रास किंवा हृयाचा काही त्रास आढळल्यास त्या रुग्णाच्या इसीजीचा फोटो काढून ग्रुपवर शेअर केला जातो, त्यानंतर जवळपास असणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णावर उपचारास सुरुवात केली जाते. विशेष बाब म्हणजे उपचाराच्या सर्व सुविधा निशुल्क असतात. हॉस्पिटलचा खर्च जास्त येईल म्हणून काहीजण उपचार घेतही नाहीत, त्यात नक्षलग्रस्त भागामध्ये सोयीसुविधा जरी पुरवल्या तरी उपचाराचे परवडणारे दर असायला हवेत, त्यामुळे उपचारांचा कोणताही खर्च होणार नाही याची काळजी यांनी घेतली आहे.
हे केवळ गोंदियापुरतीच मर्यादित नसून प्रमेश यांच्या कामाची प्रेरणा घेऊन राज्यभरात याचं अनुकरण केलं जात आहे. फक्त व्हॉट्सअॅप ग्रुपच नाही तर भंडारा-गोंदियातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन करिअरविषयी ते मार्गदर्शनदेखील करतात. एकीकडे आजची तरुणाई सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहत असताना दिसतेय तर दुसरीकडे अशा काही उपक्रमाच्या मदतीने सोशल मीडियाचा योग्य वापर करुन लोकांचे जीव वाचवले जातायत. समाजाला नवी दिशा कशी मिळेल याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. प्रमेश आहेत असं म्हणायला हरकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
Advertisement