एक्स्प्लोर
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी?
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची नियमित बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अविकसित जिल्ह्यांमधील पदे भरण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. तसेच जनहिताच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा यापुढे मिळावा या निर्णयालाही मंजुरी मिळाली आहे. याच निर्णयाप्रमाणे आणखी एक महत्वाचा निर्णयही आज घेण्यात आला. राज्यभरात 3165 तलाठी भरतीला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त): 16 मे 2017
- राज्यातील सर्व क आणि ड वर्ग महापालिकांसह सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांची जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित मालमत्ता आकारणी होणार.
- राज्यात ३१६५ नवीन तलाठी साझे व ५२८ नव्या मंडळ कार्यालयांच्या निर्मितीला मान्यता.
- ई-एसबीटीआर द्वारे मुद्रांक शुल्क भरण्याची किमान मर्यादा पाच हजाराहून 100पर्यंत कमी करण्याचा निर्णय.
- महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियमांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
- राज्य शासनाच्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पांच्या उभारणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा अशा प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या शासकीय यंत्रणेकडे देण्याबाबतचे धोरण.
- परळी औष्णिक विद्युत प्रकल्पातील संच क्र. ८ च्या जागी 250 मे. वॅ. क्षमतेचा नवीन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या 2081 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजित खर्चास मान्यता.
- महानिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत विस्तारित प्रकल्पातील संच क्रमांक ८ आणि ९ च्या वाढीव १ हजार ५०४ कोटी ४२ लाख रुपये प्रकल्प खर्चास मंजुरी.
- महानिर्मिती कंपनीच्या कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील संच क्रमांक ८, ९ आणि १० च्या वाढीव २ हजार १४६ कोटी ५९ लाख रुपये प्रकल्प खर्चास मान्यता.
- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुसूची-१ मधील अनुच्छेद 25 व अनुच्छेद 34 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.
- नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकेतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय.
- पुणे जिल्ह्यातील 12 तलाठ्यांच्या अनियमित नेमणुका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या दिलेल्या आदेशानुसार नियमित करण्याचा निर्णय.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















