Kolhapur Crime : कोल्हापुरात तब्बल साडे तीन कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; तिघांना बेड्या ठोकल्या
Kolhapur Crime : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची 3 किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (Ambergris also known as Whale Vomit) जप्त केली.
Kolhapur Crime : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची 3 किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (Ambergris also known as Whale Vomit) जप्त केली.
प्रदीप शाम भालेराव (वय 36, रा. मुंबई, चेंबूर), शकील मोहन शेख (वय 34, रा. येरवडा, पुणे) आणि अमीर हाजू पठाण (वय 32, रा. विश्रांतवाडी, पुणे) या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. संशंयितांची रवानगी गांधीनगर पोलिसांकडे करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्तर, सौंदर्य उत्पादने आणि औषधे बनवण्यासाठी अॅम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाच्या उलटीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले म्हणाले की, “पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सरनोबतवाडी येथील सर्व्हिस रोडवर अॅम्बरग्रीसच्या अवैध व्यापारासाठी काही लोक येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता तीन जणांकडून अॅम्बरग्रीसची तस्करी होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून एक कार, मोबाईल फोन आणि अंबरग्रीस जप्त करण्यात आले. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, श्रीकांत मोहीते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, अनिल पास्ते, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, उत्तम सडोलीकर, रफीक आवळकर, वनअधिकारी रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांनी सहभाग घेतला.
व्हेल माशाची उलटी अतिशय मौल्यवान
व्हेल माशाची उलटी केवळ बाजारात विकली जात नाही, तर ती कोणत्याही हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. व्हेल मासा हा पृथ्वीवरील असा जीव आहे, ज्याच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. व्हेल माशाच्या उलटी अॅम्बरग्रीस (Ambergris) या नावानेही ओळखली जाते. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ. वास्तविक ते व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडते. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. अॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन असते. एकप्रकारे तो मेणापासून बनलेला दगडासारखा पदार्थ आहे.
व्हेलची उलटी महाग का?
अॅम्बरग्रीस हा सुगंधी पदार्थ असतो. तो फार दुर्मिळ असतो, सहज सापडत नाही. याचा वापर नैसर्गिक परफ्युम बनवण्यात केला जातो, हे परफ्युम किंवा अत्तरे फार महागडी असतात. व्हेल माशाची उलटी किंवा अंबरग्रीस जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. तो गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा सुद्धा होऊ शकते. लोक जर या पदार्थाच्या मागे लागले तर व्हेल माशांना त्रास देऊन पकडतील, पर्यायाने व्हेलची संख्या कमी होईल.
इतर महत्वाच्या बातम्या