Heat Wave : मुंबई, ठाण्यात उकाडा वाढला! विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची धुमाकूळ
Marathwada Weather : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट तर, मराठवाडा, विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. राज्यात काही भागात जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरु आहे, तर काही भागात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मराठवाडा, विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येणाची शक्यता आहे. आठवड्याभरात झालेल्या अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं असताना अद्यापही पावसाची शक्यता कायम असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कुठे ऊन, कुठे पाऊस
मुंबई आणि उपनगरात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा 40 पारा पोहोचला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची झळ
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअसवर होते, तर कुलाब्यात कमाल तापमान 34.1 अंश सेल्सिअसवर होते. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र आणि दमट हवामान राहील. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाटेची होण्याची शक्यता आहे. मुंबईत आज कमाल 38°C आणि किमान तापमान 27°C च्या आसपास असेल.
आयएमडीचा अंदाज काय सांगतो?
मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 30, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/Kz4ZCap1mb
या भागात पावसाच्या सरी
कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट तापमान राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पाहायला मिळतील.
कोकणात उष्णतेची लाट
उत्तर कोकणातील विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील विविध भागात उष्ण आणि दमट स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यासोबतच पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हवामान कोरडे राहील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :