एक्स्प्लोर

नव्या नियमावलीमुळे 130 रुपयांत दिसणार 200 चॅनल्स, ट्रायचा मुंबई उच्च न्यायालयात दावा

ट्रायने नव्यानं जारी केलेल्या निर्देशांनुसार टीव्ही चॅनेल्सच्या दरांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये नेटवर्क कॅपॅसिटी फी 130 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

मुंबई : सॅटेलाईट टेलिव्हिजन वाहिनीच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि समानता निर्माण करण्यासाठीच सुधारित दर लागू करण्यात आले आहेत, यामुळे ग्राहकांचे हित साध्य होऊ शकेल, असा खुलासा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. ट्रायने नव्यानं जारी केलेल्या निर्देशांनुसार टीव्ही चॅनेल्सच्या दरांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये नेटवर्क कॅपॅसिटी फी 130 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या शुल्क मर्यादेमुळे ग्राहकांना फायदाच होईल आणि दरांमध्ये सुसुत्रिकरण येऊ शकते, असे ट्रायचे म्हणणे आहे. ट्रायच्या वतीने याबाबत हायकोर्टात बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. ट्रायने सर्व चॅनेल कंपन्यांना दिलेल्या निर्देशानुसार सुधारित दरांची माहिती त्यांनी 15 जानेवारीपर्यंत जाहीर करणे बंधनकारक होते. मात्र चॅनेल चालकांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ट्रायचा निर्णय हा मनमानी असून चॅनेल चालकांच्या अधिकारांवर आक्रमण करणारा आहे, असा आरोप या याचिकेतून केला आहे. मात्र यापूर्वी ग्राहकांवर चॅनेल चालकांनी अचानक जादा शुल्क आकारले होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे केबल टीव्हीचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले होते. जे ग्राहकांच्या हितामध्ये बाधा आणणारे आणि त्यांच्या पसंतीवर अतिक्रमण करणारे होते. असे होऊ नये, यासाठी संबंधित निर्देश जारी केलेले आहेत, असा खुलासा यामध्ये केला आहे. नव्या शुल्कआकारणीमुळे ग्राहकांना चॅनेल निवडीचा अधिकार मिळणार आहे, असा दावा यामध्ये केला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुरू असलेल्या या याचिकेवर पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार आहे. यापूर्वी फ्री टू एअर चॅनेलसाठी 130 रूपये शुल्क आकारण्याची मर्यादा होती आणि त्यापुढे पसंतीचे चॅनेल घेण्यासाठी वेगवेगळे पॅकेजेस उपलब्ध होते. मात्र नव्या निर्देशांनुसार आता 130 रूपयांमध्ये किमान 200 चॅनेल्स ग्राहक पाहू शकतात. त्याशिवाय स्वंतत्र चॅनेलच्या दरामध्येही बंधने घालण्यात आली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासाABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैदMurlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
Embed widget