एक्स्प्लोर
Advertisement
बीडमध्ये वॉटर एटीएम, एक रुपयात एक लिटर थंड पाणी
बीड शहरातील नवगण कॉलेजसमोर एक असं एटीएम आहे, जिथली गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाही. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत ही गर्दी कायम असते.
बीड : गेल्या काही दिवसांपासून एटीएमवर गर्दी असल्याची बातमी तुम्ही पाहिली असेल. पण बीड शहरातील नवगण कॉलेजसमोर एक असं एटीएम आहे, जिथली गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाही. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत ही गर्दी कायम असते.
एक रुपयात एक लिटर पाणी देणारं एटीएम
आपण ज्याची चर्चा करतोय, ते एक अनोखं एटीएम आहे. या एटीएमवर एक रुपयात पिण्याचं थंड पाणी मिळतं. मान्सून लवकरच दाखल होणार असला तरी उन्हाची तीव्रता अजून कमी झालेली नाही. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात अगदी थंड पाणी देणाऱ्या या पाण्याच्या एटीएमला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
प्रकल्प उभा करण्यासाठी सात लाखांचा खर्च
व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या विकास मांडवे यांनी हे पाण्याचं एटीएम सुरु केलं. या एटीएममध्ये 24 तास पाणी उपलब्ध असतं. एक रुपयामध्ये एक लिटर, तर पाच रुपयांमध्ये दहा लिटर आणि दहा रुपयांमध्ये एक जार पाणी मिळतं. रोज पाण्याचे दोन टँकर विकत घेऊन मांडवे लोकाना हे थंडगार पाणी पुरवत आहेत. हा प्रकल्प उभा करायला जवळपास सात लाखांचा खर्च आलाय. ना नफा, ना तोटा या तत्वावर हा व्यवसाय सुरु आहे.
सुट्टे पैसे नसले तरी चिंता नाही
या एटीएममधून पाणी घेऊन जायचं असेल, तर नोटा चालत नाहीत. केवळ एक रुपयाचा आणि पाच रुपयाचा कॉईन टाकल्यानंतरच यातून पाणी येतं. पण या वेळी पाणी नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सुट्टे पैसेही विकास मांडवे यांनी उपलब्ध करुन दिले आहेत. म्हणूनच एकीकडे बाजारात एक लिटरच्या पाण्याच्या बाटलीला 20 रुपये आणि जारला तीस रुपये लागत असताना अवघ्या एक रुपयात पाणी उपलब्ध होत असल्याने लोक पाणी नेण्यासाठी गर्दी करत आहेत.
पाण्याविषयी लोकांमध्ये कमालीची जागरुकता आली आहे. म्हणूनच अगदी ग्रामीण भागातील लोकांचाही फिल्टर पाणी पिण्याकडे ओढा वाढलाय. किफायतशीर दरात नागरिकांना थंड आणि शुद्ध पाणी पाजणारा विकास हा भगीरथ ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement