एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज नाटक बघा, पैसे उद्या द्या, 'अमर फोटो स्टुडिओ' नाटकाची जाहिरात
पुणे : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने, चलन तुटवड्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असतानाच, सिनेमा आणि नाट्यगृहांनाही त्याचा फटका बसत आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रेक्षकांची वानवा असल्याने पुण्यातील यशवंत चव्हाण नाट्यगृहाने यावर भन्नाट उपाय शोधला आहे. नाटक आज बघा, पैसे उद्या द्या, अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्यात आली आहे.
'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकासाठी यशवंत चव्हाण नाट्यगृहाने वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. या नाट्यगृहात 'अमर फोटो स्टुडिओ' नावाचं नाटक शनिवार 19 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता लागणार आहे. अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, सिद्धेश पुरकर यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे.
चलनी नोटांच्या तुटवड्यामुळे चेकद्वारे पैसे स्वीकारण्याची तयारी नाट्यगृहचालकांनी दाखवली आहे. एवढंच नव्हे तर पैसे नंतर दिले तरी चालतील, असंही सांगण्यात आलं आहे.
वृत्तपत्रातील जाहिरात
आज नाटक बघा, पैसे उद्या द्या
आमचा आमच्या प्रेक्षकांवर विश्वास आहे. पेमेंट चेकने स्वीकारु, अगदीच ह्या घडीला वैध नोटा नसतील, तर आज नाटक पाहा आणि आठवड्याभरात पैसे आणून द्या. एक नक्की, नाटक रोख आणि खणखणीत दाखवू.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement