Washim News : अस्मानी संकटानंतर खतांचाही तुटवडा; डीएपी सारखी रासायनिक खते मिळणेही होणार कठीण
Washim News : अस्मानी संकटानंतर आता शेतकऱ्यांना ही रासायनिक खते मिळणार नसल्याचे चित्र आहे. कारण रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यानी डी ए पी खते निर्मिती जवळपास बंद केल्याची माहिती समोर आली आहे
Washim News वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला कि शेतकरी पेरणीच्या तयारीला लागत असतात. मात्र, पेरणीपूर्वी शेतकरी आपल्या शेतात पिकाच्या वाढीसाठी डीएपी सारखी रासायनिक खते वापरत असतात. असे असताना आता शेतकऱ्यांना ही रासायनिक खते मिळणार नसल्याचे चित्र आहे. कारण रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यानी डीएपी खते निर्मिती जवळपास बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डीएपी सारखी खते कमी किमतीत देणे शक्य नसल्याचे खत विक्रेते आणि व्यापऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या हंगामात डीएपी सारखी रासायनिक खते मिळण्याची शक्यता जवळ जवळ मावळली आहे. तर शेतकऱ्यांनी डीएपी खताला पर्याय म्हणून इतर खते वापरून आपली गरज भागवावी, अस आवाहन देखील करण्यात आले आहे.
डीएपी खते मिळणे होणारा कठीण
सध्या देशातील सरकारी धोरण आणि हमास, इजराईल येथे युद्धजन्य परिस्थितीत होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे रासायनिक खताच्या निर्मितीसाठी लागणरे साहित्य गरजे नुसार मिळत नाहीये, तसेच जे मिळत आहे त्यांचे दर जास्त असल्याने ते खरेदी करणे शक्य नसल्याचे खत व्यापऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे शासनाकडून मिळणाऱ्या सवलती देखील तुटपुंजी असल्याने अशा खतांची निर्मिती करणे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही परवडणारे नाही. त्यामुळे या हंगामात शेतकऱ्यांना डी ए पी सारखी रासायनिक खते मिळणार नसल्याचे मत रासायनिक खताचे होलसेल विक्रेते नितीन पाटणी यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.
तेंदूपत्ता माफीयांचा वनविभागाला लाखोचा चुना
वाशिम जिल्हा हद्दीतील तेंदूपत्ता पळवून तो अकोला वन परिक्षेत्रातील असल्याचे दाखवून वनविभागाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील धरमवाडी, माळेगाव,परिसारत हा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे बघायला मिळाले आहे. तेंदूपत्ता माफियाकडून मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने तेंदूपत्ता तस्करी होत असून वाशिम वनविभाग याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न या निमत्याने निर्माण झाला आहे.
कारवाई करत तेंदुपत्ता जप्त करण्याची मागणी
तेंदूपत्याचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेऊन परिसरातील नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तेंदूपत्ता ठेवल्या जाणाऱ्या डेपो (फड) हा सरकारी नियमाने हर्रास झालेल्या त्या परिक्षेत्राच्या तीन किलोमीटर अंतरात ठेवावा लागतो. मात्र, अस न करता वाशिम जिल्हा हद्दीत वन विभागाच्या हद्दीत ठेवून वन अधिकारी यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात तेंदूपत्याची अफरातफर केली जात असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र, वाशिम वनविभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. वन विभागाने या प्रकरणी कारवाई करत तेंदुपत्ता जप्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या