एक्स्प्लोर
Advertisement
साखरपुड्यापूर्वी सिलेंडर स्फोट, 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू
वाशिम : वाशिम शहरात मंगल कार्य असलेल्या कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे. साखरपुडा असलेल्या घरात सिलेंडरच्या स्फोटामध्ये 16 वर्षांच्या तरुणीचा होरपळून मृत्यू झाला.
वाशिम शहरातील दत्तनगर परिसरात सकाळी 7.15 च्या सुमारास ही घटना घडली. मानवतकर कुटुंबातील मोठ्या मुलीचा साखरपुडा नियोजित होता. त्यासाठी घरात 25 ते 30 नातेवाईक जमले होते.
नातेवाईकांसाठी सकाळी चहा-नाश्ता करण्याची लगबग सुरु असतानाच सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर सर्व नातेवाईक लगोलग घराबाहेर पळाले. मात्र भेदरलेली 16 वर्षांची माला टेबलाखाली लपली. मात्र आगीत तिला प्राण गमवावे लागले. मयत तरुणी साखरपुडा असलेल्या मुलीची धाकटी बहीण होती.
सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. सिलेंडरमधील लिकेजमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगल सोहळ्याच्या दिवशीच घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement