एक्स्प्लोर

Wardha River Flood : वर्धा नदीच्या महापुराला 31 वर्ष पूर्ण, 204  गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी, अद्यापही विकासकामं अपूर्ण

31 वर्षापूर्वी म्हणजे 30 जुलै 1991 ला  नागपूर (Nagpur)  जिल्ह्यातील वर्धा नदीला महापूर आला होता. यामध्ये 204 जणांचा मृत्यू झाला होता.

Wardha River Flood News : बरोबर 31 वर्षापूर्वी म्हणजे 30 जुलै 1991 ला  नागपूर (Nagpur)  जिल्ह्यातील मोवाड इथे एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनं मोवाडवासीयांना (Mowad) हादरुन सोडलं होतं.
31 वर्षापूर्वी वर्धा नदीनं रौद्ररुप धारण केलं होतं. वर्धा नदीच्या या महापुरात तब्बल 204 गावकऱ्यांना जलसमाधी मिळाली होती. मोवाडसह वर्धा नदीच्या काठावरील 12 गावांसाठी या पुराचा फटका बसला होता. या महापुराला 31 वर्ष पूर्ण झाली असून, अजूनही तेथील अनेक आश्वासने अपूर्ण आहेत.

नागपूर जिल्ह्यातील मोवाड इथे 30 जुलै 1991 च्या पहाटे मोवाड परिसरात वर्धा नदीने रौद्ररुप धारण केले होतं. त्यापूर्वीही या गावानं वर्धा नदीचे असंख्य पूर पाहिले होते. परंतू, 1991 चा महापूर भयावह होता. त्यामुळं तेव्हाच्या वेदना आजही कायम आहेत. मोवाडसह वर्धा नदीच्या काठावरील 12 गावांसाठी त्या दिवशी वर्धा नदी कोपली होती. नदीचा नेहमीचा पाट त्या दिवशी प्रचंड विस्तारला होता. पाण्यानं अवती भोवतीच्या शेकडो हेक्टर शेतीला गिळंकृत करत गावांमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळं पहाटेच्या सुमारास बेसावध असताना पाण्याचा प्रवाह 204 जणांना सोबत घेऊन गेला होता. पुढील अनेक दिवस मोवाड आणि जवळच्या गावापासून कित्येक किलोमीटर लांबपर्यंत लोकांचे मृतदेह चिखलात आढळले होते. आज त्याच दुर्दैवी घटनेला 31 वर्षे पूर्ण झाली असून, मोवाडवासी आजही त्या घटनेच्या सावटातून बाहेर येऊ शकले नाहीत.

Wardha River Flood : वर्धा नदीच्या महापुराला 31 वर्ष पूर्ण, 204  गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी, अद्यापही विकासकामं अपूर्ण
 
काय घडले होते त्या दिवशी 

मोवाड हे अत्यंत जुने गाव सर्व अर्थाने समृद्ध होते. त्यामुळं 'मोवाड हे सोन्याचे कवाड(दार)' ही म्हण संपूर्ण नागपूरात प्रसिद्ध होती. मोवाड हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे. मोवाड हे नरखेड तालुक्यातील गाव असून, वर्धा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. 30 जुलै 1991 रोजी रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. दिवस उजडण्याआधीच संपूर्ण मोवाड गाव जलमग्न झालं होतं. झोपेत असलेल्या मोवाडवासियांना सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. लोक पाण्याचा लोट व त्यासह आलेल्या चिखलात वाहून गेले होते. पुढील अनेक दिवस मोवाड आणि जवळच्या गावापासून कित्येक किलोमीटर लांबपर्यंत लोकांचे मृतदेह चिखलात आढळले होते. 

Wardha River Flood : वर्धा नदीच्या महापुराला 31 वर्ष पूर्ण, 204  गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी, अद्यापही विकासकामं अपूर्ण

मोवाड होते सोन्याचे कवाड

मोवाड नगरपालिकेची स्थापना 17 मे 1867 ला झाली होती. त्याला 154 वर्षे पूर्ण झाली आहेत. इंग्रजांच्या काळापासून इथली नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चले जाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडमध्ये विणकरांची मोठी बाजारपेठ होती. सोबतच इथली बैलबाजार देखील संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होती. त्याकाळी येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे. त्यामुळं मोवाड गावात समृद्धी होती आणि त्यामुळेच मोवाड सोन्याचे कवाड असे त्याकाळी म्हटले जात होते. मात्र, महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे. गावाची समृद्धी महापुराने वाहून नेली आणि नंतर राजकारण्यांनी पुनर्वसन आणि लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यामुळं गाव तीन दशकानंतरही महापुराच्या धक्क्यातून सावरलं नाही. 

मोवाडवासी पाळणार काळा दिवस

महापूरामुळं जीवनाची घडी विस्कटल्याची खंत लोकांच्या चेहऱ्यांवर दिसून येते. महापुराच्या विनाशाला 31 वर्षे पूर्ण होत झाली. निश्पाप 204 लोकांना जलसमाधी मिळाली. म्हणून दर वर्षी 30 जुलै काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. 30 जुलैला व्यापारी दुकाने बंद ठेवतात. प्रत्येक घरचा नागरिक श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जातो. अनेक घरात आजही आप्त स्वकीयांच्या आठवणीने चूल पेटवली जात नाही.  

Wardha River Flood : वर्धा नदीच्या महापुराला 31 वर्ष पूर्ण, 204  गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी, अद्यापही विकासकामं अपूर्ण

 सरकारचे दुर्लक्ष   

महापूरानंतर मोवाड गाव हळू हळू कामाला लागले तरी शासकीय यंत्रणेच्या अपयश पावलो पावली जाणवते. गावाचे गावपण पुन्हा केव्हा परतेल, आणखी किती दिवस वाट बघावी लागेल, याचीच येथील प्रत्येक नागरिक वाट बघत आहेत. विणकरांच्या व्यवसायाला पुन्हा भरभराटी आणण्यासाठी गेल्या 30 वर्षात शासनाकडून प्रयत्न झाले नाहीत. केवळ खोटी अश्वासने देऊन मतांचा जोगवा मागण्याचे काम करण्यात आले. पंचक्रोशीत असलेली मोवाड बाजारपेठेची ख्याती कायमची पुसली गेली. ती पुन्हा यावी यासाठी शासकीय प्रयत्न झाले नाहीत. बाजार कमकुवत झाल्याने रोजगारही नष्ट झाले. रोजगारासाठी मोवाड मधील शिक्षित तरुण शहराकडे भटकंती करत असल्याचे विदारक चित्र आहे.

परत येईल का मोवाडचे वैभव 

महापुराच्या आधी मोवाड येथील शेतकऱ्यांजवळ जवळपास 1 हजार 650 एकर जमीन होती. महापुरामध्ये जवळपास 650 एकर जमीन खरडली गेली. आता ती पडीक आहे. परंतू, अद्याप सर्व शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार आहे. 400 एकर जागेमध्ये गावाचे पुर्नवसन झाले आहे. 650  एकर जमीन रेल्वेमार्गात गेली. परिणामी शेती विस्कळीत झाली. महापुराच्या वेळी 11 हजार 500 लोकसंख्या होती. मात्र, नंतर गावात रोजगार नसल्यामुळं लोकांनी स्थलांतरण केले. आज गावाची लोकसंख्या 8 हजारांच्या घरात आहे.

Wardha River Flood : वर्धा नदीच्या महापुराला 31 वर्ष पूर्ण, 204  गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी, अद्यापही विकासकामं अपूर्ण

मोवाड मधील शहीद पोलिसांचे पुतळे जागवताहेत आठवणी 

30 जुलै 1991 च्या महापुरात गावकऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कर्तव्यदक्ष पोलीस समाधन इंगळे आणि वामनराव मेंढे हे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते. आता फक्त स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्राणंगात त्यांचे पुतळे आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या पुतळ्यावर गेल्या 30 वर्षात छतसुध्दा टाकण्यात आले नाही. तसेच त्या पुतळ्या सभोवताली कठडे बांधून साधी डागडुजी देखील पोलीस प्रशासन किंवा शासन करत नाही. दरवर्षी फक्त श्रध्दांजली वाहण्याचे काम केले जाते.

Wardha River Flood : वर्धा नदीच्या महापुराला 31 वर्ष पूर्ण, 204  गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी, अद्यापही विकासकामं अपूर्ण

मोवाड गावात अत्यावश्यक असलेली विकासकामं

शहरातील बस स्थानकासमोरील रस्त्यासह इतर अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणी नवीन रस्ते बांधणे अत्यंत गरजेचे आहे. गावातील नळ योजना जुनी झाली असून, गावासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा करण्यात अक्षम आहे. अशात गावात पुरेसा पाणीपुरवठा करणारी नळ योजना निर्माण करणे आवश्यक आहे. गावातील शाळा, नगरपालिकेची इमारत तसेच अनेक इतर शासकीय इमारतींना डागडूजीची आवश्यकता आहे.
त्यामुळं 31 वर्षांपूर्वी दुःखाच्या प्रसंगी फक्त सहानुभूती व्यक्त करुन विसरलेल्या शासनानं मोवाड गावाकडं पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shiv Sena Uddhav Thackeray Group  Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चाEknath Shinde Ratnagiri Speech| दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचे आक्रमक भाषणSuresh Dhas On Santosh Deshmukh Case:धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यायला पाहिजे होती : धसChhaava movie review: विकी कौशलचा 'छावा' सिनेमा कसा आहे? पहिला मराठी रिव्ह्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव
सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना सुवर्णपदक, 68 व्या ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना सुवर्णपदक, रांचीतील स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.