(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu-Kashmir Flood : जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, सैन्याने बचावकार्यात 30 जणांचे प्राण वाचवले
Jammu-Kashmir Flood : जम्मू आणि कश्मीरमधील पूँछ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूर येऊन 30 अडकले. सैन्याने बचावकार्य करत अडकलेल्यांची सुटका केली.
Jammu-Kashmir Flood : जम्मू आणि काश्मिरमध्ये बहुतेक भागात पाऊस दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरमध्ये काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अलिकडे उत्तराखंड (Uttarakhand), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) पासून जम्मू आणि काश्मिर (Jammu and Kashmir) मधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात 30 जण अडकले होते. सैन्य दलाने बचावकार्य राबवत या अडकलेल्या सर्वांचे प्राण वाचवले.
जम्मू काश्मिरमधील अखनूर येथील चिनाब नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे चिनाब नदी दुथडी भरून वाहत आहे. जोरदार पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जम्मू काश्मिकच्या पूँछ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. यावेळी पुरात अनेक जण अडकले होते. प्रशासनाने पुरात अडकेलेल्या लोकांसाठी बचावकार्य राबवत सर्वांची सुखरुप सुटका करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं.
लष्कराने पुरात अडकलेल्या 30 जणांची सुटका केली
#WATCH | Jammu and Kashmir: Indian Army personnel rescued 30 civilians who got trapped after the water level increased in the Poonch river, earlier today pic.twitter.com/GOJB7KUTN2
— ANI (@ANI) July 29, 2022
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, चांडक बेला भागात आलेल्या पुरात 30 नागरिक अडकल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच लष्कराच्या जवानांचं एक पथकं बचावकार्यासाठी पाठवण्यात आलं. यादरम्यान लष्कराच्या जवानांनी पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथक (SDRF) यांच्यासोबत मिळून नागरिकांना वाचवण्यासाठी मोहीम राबवली.
डोंगराळ भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं की, दिवसभर बचाव मोहिम राबवण्या आल्यानंतर पुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती येथे नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, तर उत्तराखंडमधील चमोली येथे डोंगराचा मोठा भाग खचून भूस्खलन झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Heavy Rain : राजस्थानसह जम्मू काश्मिरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
- Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मिर: पुलवामामध्ये चेकपोस्टवर दहशतवादी हल्ला, सीरआरपीएफचा एक जवान हुतात्मा
- Rubaiya Sayeed Case : 'हाच तो यासीन मलिक', CBI कोर्टात रुब्या सईदने अपहरणकर्त्याला ओळखलं, 33 वर्षांपूर्वीचं प्रकरण