एक्स्प्लोर
हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून
मुंबईतील नॅशनल बर्न्स इन्स्टिट्यूट मधले बर्न्स स्पेशालिस्ट डॉक्टर केसवणी यांच्यासह डॉक्टरांची टीम सायंकाळी 6 च्या विमानाने नागपूरला जाणार आहे. पिडित मुलीच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मुंबई : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका तरूणाने केला. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच या भाजलेल्या जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावेत, या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच पीडित मुलीच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नागपूरला मंगळवारी ( 4 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता रवाना होणार आहे.
मुंबईतील नॅशनल बर्न्स इन्स्टिट्यूट मधले बर्न्स स्पेशालिस्ट डॉक्टर केसवणी यांच्यासह डॉक्टरांची टीम सायंकाळी 6 च्या विमानाने नागपूरला जाणार आहे. पिडित मुलीच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पिडीत मुलींच्या उपचाराबाबत आदेश दिले आहे. अजित पवार म्हणाले, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. राज्य शासन वर्धा- हिंगणघाट घटनेतील पिडीत तरुणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तरुणीच्या वैद्यकीय उपचाराबाबत आदेश देण्यात आले असून उपचाराची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन घेईल.
Hinganghat Woman Ablaze | आरोपीला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी | ABP Majha
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, शासनाच्या महात्मा फुले संजीवनी योजनेमार्फत पीडित मुलीच्या उपचारासाठी मदत करणार आहे. आता उपचार सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयातून पीडितेला हलवण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितले तर अद्यावत रुग्णालयात तिला दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच पीडित मुलीला कुठल्याही प्रकारे आर्थिक अडचण येणार नाही याची खात्री दिली.
पिडित मुलीच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेणार असल्याचं वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. पालकमंत्री या नात्याने सर्व यंत्रणेशी संपर्कात आहे. फास्ट ट्रॅकमध्ये या प्रकरणाचा निकाल काढणार आहे. पीडित मुलीचा जीव वाचावा हीच आमची प्राथमिकता आहे. फक्त जीव वाचवून थांबणार नाही तर पुढच्या पुनर्वसनाची आणि प्लास्टिक सर्जरीसाठी आर्थिक मदतीची संपूर्ण जबाबदारी शासन घेणार आहे. त्या मुलीला भविष्यात सन्मानाने जगण्यासाठी शासन पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. फक्त आरोपीच नाही तर त्याला मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
भाजप आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, मानवी मनाला काळीमा फासणारी ही घटना आहे. तिच्यावर चांगले उपचार करून तिला वाचवण्याची गरज आहे. तिला मुंबईत किंवा परदेशात हलवा, सर्व खर्च सरकारने करावा तसेच तिला जगण्यचा अधिकार मिळवून देण्याची आवश्यकता आहे.
संबंधित बातम्या :
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीला 10 मिनिटासाठी ताब्यात द्या, नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement