एक्स्प्लोर

Mahadev Munde Case: आता वाल्मिक कराडचा मुलगाही गोत्यात येणार, महादेव मुंडेंचे कुटंबीय पोलीस अधीक्षकांना भेटणार, बीडमध्ये घडामोडींना वेग

या खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलाचं नाव घेतलं जातं. तपास उपअधीक्षकांकडे या प्रकरणाचा तपास वर्ग झाल्यानंतर आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे खंडणी ते हत्या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप असणारा वाल्मीक कराड (Walmik Karad) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान परळीत भर तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे खून प्रकरणात (Mahadev Munde Case) पंधरा महिने उलटूनही आरोपी फरारच आहे. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलाचं नाव घेतलं जातं.  दरम्यान  वाल्मीक कराड नंतर आता त्याचा मुलगाही गोत्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाला आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुन्हा एकदा वाचा फोडल्यानंतर बीड मधील घडामोडींना वेग आला आहे. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलीस उपाधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती असून सकाळी 11 वाजता मुंडे कुटुंबीय अंबाजोगाई येथील कार्यालयात जाणार आहेत.

दरम्यान बीड पोलीस अधीक्षकांच्या निर्णयानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास परळी पोलीस ठाण्यातून काढून घेतला असून बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे वर्ग केला आहे. तपास उपअधीक्षकांकडे या प्रकरणाचा तपास वर्ग झाल्यानंतर आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून व्हावा अशी मागणी केली होती. (Beed)

नक्की प्रकरण काय? 

परळीमध्ये भोपळा येथील मूळ रहिवासी असलेले महादेव मुंडे या व्यवसायिकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. 22 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयाच्या वेळील प्रांगणात महादेव मुंडे यांचा मृतदेह आढळला. या घटनेला 14 महिने उलटून गेले तरी आरोपी फरार असून खून प्रकरणाचा तपासही झाला नसल्याचं आमदार सुरेश धस यांनी समोर आणलं होतं. या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. मात्र परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्याचे आदेश काढण्यात आले.

या खून प्रकरणात मुंबईतील सायबर तज्ञांनी 150 मोबाईल काढले. मात्र बीड पोलिसांनी या मोबाईलची साधी चौकशीही केली नाही असा आरोप धस यांनी केला होता. या खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलाचं नाव घेतलं जातं. खून झाला त्या घटनास्थळावरून वाल्मिक कराडचा मुलगा सुनील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या सगळ्या आरोपानंतर बीडमध्ये घडामोडींना वेग आला आहे. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा:

Mahadev Munde : परळीतील महादेव मुंडेंचा खून कोणी केला? वाल्मिक कराडच्या मुलावर काय आरोप? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषणMahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईनMakrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Embed widget