एक्स्प्लोर
शिवाजी महाराज सर्वात जास्त प्रेरणा देतात: विश्वास नांगरे-पाटील

मुंबई: 'आत्मविश्वास हेच अपयशाला पराभूत करण्याचं औषध', असा सल्ला विश्वास नांगरे पाटील यांनी आजचा तरुणाईला दिला आहे. तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी माझा कट्ट्यावर अनेक गोष्टींचा उलगडा केला. पाहा आज रात्री साडेआठ वाजता विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह सगळ्यात पॉझिटिव्ह माझा कट्टा.
आयपीएस अधिकारी ते लेखक असा प्रवास करणाऱ्या नांगरे-पाटील यांनी माझा कट्ट्यावर आपले अनेक अनुभव शेअर केले. याचवेळी त्यांनी अनेक प्रशांना खुमासदार उत्तरंही दिली. तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा कोण देतं? या प्रश्नावर नांगारे-पाटील यांनी फारच समर्पक उत्तर दिलं. "शिवाजी महाराज सर्वात जास्त प्रेरणा देतात. प्लॅनिंग कसं असावं हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे." असं त्यांनी उत्तर दिलं.
यासह त्यांनी 26/11 हल्ल्यातील अंगावर काटा आणणारे अनुभवही सांगितले. स्फुरण चढविणारे त्यांचे अनेक अनुभव आज रात्री साडे आठ वाजता एबीपी माझावर नक्की पाहा.
VIDEO:
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























