एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar : सांगलीच्या जागेबाबत विश्वजीत कदमांचा दावा योग्य, पण आता वाद वाढवायचा नाही; वडेट्टीवारांचा सबुरीचा सल्ला

विश्वजीत पाटील यांची मागणी योग्य असून तिथे काँग्रेसची ताकत होती. मात्र, आता निवडणूक संपल्यानंतर आम्हाला वाद वाढवायचा नाही. असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सांगलीच्या जागे संदर्भात भाष्य केलंय.

Sangali Lok Sabha Election 2024 सांगली : नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील (Maharashtra News) लोकसभा निवडणुकीच्या(Lok Sabha Election 2024) घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ मोठा चर्चेत होता. सांगलीवरुन (Sangali) महाविकास आघाडीमधली धुसफुस सर्वासमोर आली होती. दरम्यान उद्धव ठाकरेंनी चर्चा सुरू असताना परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली. त्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरून अनेक दावे प्रतिदावे आणि आरोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या.  मात्र यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला.

असे असले तरी सांगलीची जागा अद्याप चर्चेचे कारण ठरत असताना, यात राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत सांगलीच्या जागे संदर्भात भाष्य केले आहे. यात त्यांनी विश्वजीत पाटील यांची मागणी योग्य होती. तिथे काँग्रेसची ताकत होती. मात्र, आघाडीत काही गोष्टी घडत असतात. आता निवडणूक संपल्यानंतर आम्हाला वाद वाढवायचा नाही. परिणामी सगळ्यांनी पुढील निवडणुकांची तयारी करावी, असा सल्ला देत या वादावर पर्दा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

विश्वजीत कदमांचा दावा योग्य, पण आता वाद वाढवायचा नाही

लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आणि जागावाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. महाविकास आघाडीने राज्यभर समन्वय साधून, भाजपविरोधात एकदिलाने काम केलं असलं तरी सांगलीत मात्र त्यांची दिलजमाई झाली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत विशाल पाटलांनी बाजी मारली. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत सांगलीच्या जागे संदर्भात विश्वजीत कदमांचा दावा योग्य होता, पण आता वाद न वाढवता पुढील निवडणुकांची तयारी करावी असा सबुरीचा सल्ला  वडेट्टीवारांनी दिला आहे.

नेत्याला पक्षात घेऊन त्याला संपवायचे ही भाजपची परंपरा 

एखाद्या नेत्याला पक्षात घेऊन त्याला संपवायचे ही भाजपची परंपरा झाली आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा भाजप (BJP) प्रवेश हाच प्रक्रियेचा भाग असल्याची खोचक टीकाही   विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. ते म्हणाले की जर तुम्हाला माहिती होते त्यांना पक्षात सामील करून घेतल्याने पक्ष पराभूत होणार आहे तर कशाला घेतलं? अशी विचारणा त्यांनी केलीय. इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या भरवशावर सामोरे जायचं आणि मग त्यांना संपवायचे, ही भाजपची जुनी पद्धत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली. 

'हा' प्रचार खोटा कसा होऊ शकतो

खोटारडेपणा कोणी केला? दहा वर्ष कोणी फसगत केली, संविधान बदलण्याची भाषा कोणत्या पक्षाची होती? शेतकरी उध्वस्त झाला याला कोण जबाबदार? महागाई वाढली, उद्योगपतींचे कर्ज माफ केली, हा प्रचार खोटा कसा होऊ शकतो याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे म्हणत भाजपकडून खोटा प्रचार करण्यात आलेल्या टीकेलाही वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा यात्रा काढू, असेही ते म्हणाले. जिथे जिथे खोटे सांगण्याचा प्रयत्न करतील तिथं आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget