(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गौ सेवा आयोग फक्त कागदावरच, मंजूर केलेला 100 कोटींचा निधी दिलाच नाही, विश्व हिंदू परिषदेचा सरकारव हल्लाबोल
राज्य सरकार गौ संरक्षणासाठी (Gauvansh sanrakshan) गंभीर नाही. "गौ सेवा आयोग" फक्त कागदावरच असून त्यांना कोणतेही अधिकारच नसल्याचे मत विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) व्यक्त केलं आहे.
Vishwa Hindu Parishad on Govt : राज्य सरकार गौ संरक्षणासाठी (Gauvansh sanrakshan) गंभीर नाही. "गौ सेवा आयोग" फक्त कागदावरच असून त्यांना कोणतेही अधिकारच नसल्याचे मत विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला. गौ संरक्षणासाठी मंजूर केलेला 100 कोटी रुपयांचा निधी आजवर दिलाच नाही. गौ संरक्षणासाठी पोलीस कारवाई करत नाहीत. राज्यात आमच्या विचारांचे (भाजपचा सरकार) असताना ही परिस्थिती असणे दुर्दैवी आहे. आमचा अपेक्षाभंग होत असल्याचे विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं आहे.
गौ हत्या प्रतिबंधक कायदा केला पण अंमलबजावणीच्या नावावर अपेक्षाभंग
वक्फ बोर्डाला निधी दिल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार विरोधात उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने आता गौ संरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील भाजप प्रणित सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राज्यात गौ संरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने गौ हत्या प्रतिबंधक कायदा केला खरा, मात्र अंमलबजावणीच्या नावावर अपेक्षाभंग होत असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र महामंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे. गौ संरक्षणासाठी पोलीस म्हणावी तशी सक्रियता दाखवत नाहीत. ठोस कारवाई करत नाही असा आरोपही विश्व हिंदू परिषदेने केला आहे. राज्यात गौ संरक्षण व्हावं या हेतूने निर्माण करण्यात आलेला "गोसेवा आयोग"ही फक्त कागदावरच असून त्याच्या अध्यक्षांना कुठलेही अधिकार नाहीत. निधीची तरतूद नाही. त्यामुळे गोसेवा आयोगावर असलेले शासकीय अधिकारीही गौ संरक्षणासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप शेंडे यांनी केला आहे.
100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली पण निधी मिळाला नाही
दरम्यान, गौ तस्करांपासून सोडवण्यात आलेल्या गाईंचे पालन करण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य सरकारने केली होती. मात्र आजवर तो निधी देण्यात आलेलं नाही. त्यामुळं राज्यातील अनेक गोशाळा आर्थिक डबघाईस आल्या असून तस्करांच्या हातातून सोडवण्यात आलेल्या गाईंची हेळसांड होत असल्याचं शेंडे म्हणाले. राज्यात आमच्याच विचाराचा सरकार असताना अशी परिस्थिती असणे हे दुर्दैवी असून अपेक्षाभंग करणारी स्थिती असल्याचं शेंडे म्हणाले. लवकरच या विषयावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि भाजपमधील महाराष्ट्रातील श्रेष्ठींना भेटणार असल्याची माहितीही शेंडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात आमच्या विचारांचे म्हणजे भाजपचे सरकार असताना देखील ही परिस्थिती असणे दुर्दैवी असल्याचे शेंडेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: