(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar : एक कोटी साडी वाटप करून मत घेण्याचं प्रयत्न सरकार करतंय - विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : 1 कोटी साडी वाटप करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करतंय असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.
Vijay Wadettiwar : महिलांना साडी देण्याचं टेंडर सरकारने काढलं आहे. साडी घोटाळा सरकार करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर केला आहे. 1 कोटी साडी वाटप करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करतंय असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. तसेच, 1 लाख 14 हजार मोबाईल खरेदीसाठी 155 कोटींची तरतूद केल्याचा आरोप देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हटले?
1 कोटी साडी वाटप करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करतंय असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. ज्यांनी आता महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलं आहे. आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरु झाला आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे. डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळे महिलांना साडी भेट देऊन मतं मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करतंय. यावरून साडी घोटाळा आता प्रकाशात आलेला आहे. असं वडेट्टीवार म्हणाले. दिवसेंदिवस घोटाळे सरकारचे समोर येत आहेत. सरकारने क्लृप्त्या लढवणे आणि घोटाळे करणे सुरु केलं आहे.
मंत्रालयात गुंड नीलेश घायवाळ
मंत्रालयात गुंड नीलेश घायवाळ रील तयार करतो. त्याच्याबरोबरं त्याचे इतर गुंड देखील आहेत. हा कशी काय एवढी हिंमत करतो? मुख्यमंत्र्याना (CM Eknath Shinde) भेटायला जातो हे कसं काय शक्य होतंय? गुंडांना बरोबर घ्यायची वेळ मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागते? अशी देखील टीका त्यांनी केली आहे.
अंब्युलन्स घोटाळा समोर आणला - विजय वडेट्टीवार
अंब्युलन्स घोटाळा मी समोर आणला होता आता अंगणवाडी सेविकांचा विषय मांडत आहे. मर्जीतील कंपनीला यांनी मोबाईल खरेदी करण्यासाठी कंत्राट दिलं आहे. कोट्यावधी रुपयांचं काम आहे. दिल्लीची कंपनी आहे ही. ही कुणाच्या जवळची आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्या कंपनीला पैसे देण्यापेक्षा अंगणवाडी सेविकांना पैसै का दिले नाहीत? यांना कमीशन आणि वसुली यासाठी त्यांनी हा घोटाळा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :