![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे आणि अजित पवार पहिले अग्निवीर ठरतील पहिल्यांदाच म्हणालो होतो; विजय वडेट्टीवारांची खोचक टीका
Vijay Wadettiwar : पक्ष विलिनीकरणावरून पवार साहेबांनी जे वर्तविले ते 100 टक्के खरं आहे, राजकारणात सध्या चिखलफेक सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.
![Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे आणि अजित पवार पहिले अग्निवीर ठरतील पहिल्यांदाच म्हणालो होतो; विजय वडेट्टीवारांची खोचक टीका Vijay Wadettiwar says I had said for the first time that cm eknath Shinde and Ajit Pawar will be the first agniveer Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे आणि अजित पवार पहिले अग्निवीर ठरतील पहिल्यांदाच म्हणालो होतो; विजय वडेट्टीवारांची खोचक टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/09/ba9093aa33a45a9f51e169c392aaf0001715252477110736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) आम्हाला 35 च्या पुढे जागांचा अंदाज आहे, या फेजनंतर आम्ही 40 जागा जिंकणार असं शरद पवार (Sharad Pawar) साहेब म्हणतील, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पक्ष विलिनीकरणावरून पवार साहेबांनी जे वर्तविले ते 100 टक्के खरं आहे, राजकारणात सध्या चिखलफेक सुरू झाली असल्याचे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अजित पवार यांनी चांगलीच खरडपट्टी केली. याबाबत बोलतना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील जे काही बोलले त्यावरून वैयक्तिक राग असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यासोबत असणं हे देखील दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पहिले अग्निवीर
वडेट्टीवार म्हणाले की, पीएम मोदी झेडपी निवडणुकीसारखे आहेत. हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांना प्रत्येक लोकसभेत जाण्याची वेळ आली आहे यातच त्यांचे अधःपतन दिसते. अजित पवार कुठे आणि कुठल्या विचाराने जाऊन बसले याचा त्यांना पश्चाताप होणार आहे. मी आधीच गंमतीने म्हणालो होतो की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पहिले अग्निविर ठरतील, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
तर ईडी काय करते?
त्यांनी पुढे सांगितले की, भाजपची जी नीती आहे ते लोकांचे घर उद्ध्वस्त करून स्वतःचे घर बसवतात, ते वेडापायी कोणल्याही थरावर जातात. राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. हिंदू, मुस्लिम, भारत पाकिस्तान चाललं नाही. अदानी अंबानी काँग्रेसला मदत करत असेल तर ईडी काय करते? असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, अमाप फायदा अदानीला कोणी करून दिला? ओएनजीसी कंपनी 93 हजार कोटींनी तोट्यात जाते, तर अदानीची कंपनी फायद्यात येते, देश लुटण्यासाठी कोणताही कोपरा ठेवला नाही, अशी टीका त्यांनी केली.
पोरांचे स्कॉलरशिप मिळत नाही, घरकुळाचे पैसे रोजगार हमीचे पैसे मिळत नाही. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी उत्पन्नातून पगार घ्यावा, असे नवा नियम काढला आहे.15 व्या वित्त आयोगाचे पैसे केंद्र सरकारने अजून दिले नाहीत. ग्राम पंचायतीचे पैसे थांबवले, यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)