Ajit pawar on PM Modi : मोदींच्या सांगण्यावरून पुतीनने युद्ध थांबवले, मोदींची अशी जगात प्रतिमा आहे : अजित पवार
निघणाऱ्या विमानांचे टेक ऑफ होईपर्यंत युद्ध थांबवले, अशी प्रतिमा मोदींची जगात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवार यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.
Ajit pawar on PM Modi : रशिया आणि युक्रेनमधे युद्ध सुरु होते, आपली मुले तिथं अडकली होती. मोदींनी पुतीनला फोन लावला आणि आमची मुले सुखरुप यावीत अशी मागणी केली. त्यावेळी पुतीनने आपल्या मुलांना घेऊन निघणाऱ्या विमानांचे टेक ऑफ होईपर्यंत युद्ध थांबवले, अशी प्रतिमा मोदींची जगात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवार यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.
अमोल कोल्हे निवडणुकीला उभे राहणार नव्हते
अजित पवार म्हणाले की, अमोल कोल्हे विकासनिधी आणण्यात कमी पडले. एकतर ते विरोधी पक्षात होते. दुसरे की ते कलाकार असल्याने ते बिझी राहिले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेवर तयार केलेला सिनेमा चालला नाही. त्याचबरोबर कौन बनेगा करोडपती सारखा कार्यक्रम ते घेऊन येणार होते. मात्र, ते विरोधी पक्षात असल्याने त्यांना तो शो मिळाला नाही आणि ते दुखावले. अमोल कोल्हे निवडणुकीला उभे राहणार नव्हते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला माहित नाही.
त्यांनी सांगितले की, मोदींवर दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. मनमोहन सिंग, राजीव गांधी यांच्यावर देखील टूजी स्कॅम, बोफोर्स सारखे आरोप झाले, पण मोदींवर आरोप झाले नाहीत हे त्रिवार सत्य असल्याचे ते म्हणाले. विरोधक हे सम दुखी असून त्यांची तोंडे चार दिशांना आहेत. जनता पार्टीचे सरकार टिकले नव्हते. यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे समजत नाही. ते म्हणतात की निवडणुकीनंतर सांगू.... तुमच्या काकांनी ठेवलय का ?
आमच्या पवार साहेबांनी संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केल आहे. लोक डोके खाजवत म्हणतील की हा कुठला नवा डाव? तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना त्यांनी मुलाखत दिली की ते काँस सोबत जातील. पण उद्धव ठाकरे कॉंग्रेस सोबत जाणार नाहीत हे माझ मत आहे. मी त्यांच्यासोबत काम केलय. मी त्यांना जवळून पाहिलय. पण पवार साहेब अस वक्तव्य का करतायत माहित नाही. आता पवार म्हणतायत की आमच्या सहकार्यांना विचारून निर्णय घेऊ. पण पवार साहेब त्यांना हवा तो निर्णय सहकार्यांकडून वदवून घेतात हा माझा गेल्या तीस वर्षांचा अनुभव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या