Vijay Wadettiwar : 'हे भांबावून गेलेलं सरकार, मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरु'; विजय वडेट्टीवारांचा घणाघात
Maratha Reservation : सरकारला विरोधकांना सोबत घेऊन काम करायचे नाही. हे भांबावून गेलेले सरकार आहे. सरकारकडून मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
Vijay Wadettiwar : सरकारला विरोधकांना सोबत घेऊन काम करायचे नाही. हे भांबावून गेलेले सरकार आहे. सरकारकडून मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरू असल्याचा घणाघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता विधिमंडळात पोहोचला असून याबाबत आज एक दिवसीय विशेष अधिवेशन (Special Assembly session) बोलावण्यात आले आहे. या विशेष अधिवेशनावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे.
हे भांबावून गेलेलं सरकार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारचा उपरता कारभार सुरु आहे. 11 वाजता राज्यपाल अभिभाषण होणार आहे. त्यानंतर गट गेत्यांची बैठक होणार आहे. या सरकारने उलट काम केले आहे. सरकारला विरोधकांना सोबत घेऊन काम करायचे नाही. हे भांबावून गेलेले सरकार असल्याची टीका त्यांनी केली आहे.
मराठा समाजाला उद्ध्वस्त करू नये
हे विधेयक मराठा समाजाच्या हितासाठी असेल आणि चर्चा होईल, असे वाटत आहे. आम्ही कोअर कमिटी बैठकीत बोलणार आहोत. मागच्या वेळी हे विधेयक एक मताने मंजूर करायला लावले पण ते कोर्टात टिकले नाही. आम्ही मागच्या वेळी म्हणालो सरकारने स्पेशल अधिवेशन घ्या. चर्चा करून विधेयक मांडले तर ते टिकेल. सरकारकडून समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला उद्ध्वस्त करायचे काम करू नये. आता आभाराचे बॅनर झळकले आहेत. उद्या उतरू नये किंवा कुणी काळ फासू नये एवढं नशीब, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी दिली आहे. थोड्यावेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलतील. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागस असल्याचेही म्हटले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हणण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या