एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar : भाजपला राज्यात जेमतेम आठ जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही; विजय वडेट्टीवार यांची गॅरंटी!

Vijay Wadettiwar : भाजपला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळतील त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही. अशा विश्वास विजय वडेट्टीवार (Vijay waddetiwar) यांनी बोलून दाखवला आहे. 

Vijay Wadettiwar On BJP : भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्ही सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मोठे विधान केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे करत आरोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या होत्या. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा फटका सगळीकडेच बसतोय. कर्नाटक, महाराष्ट्रमध्ये देखील तो दिसून येतोय. त्यामुळे आता भाजपला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळतील त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही. अशा विश्वासही विजय वडेट्टीवार (Vijay waddetiwar) यांनी बोलून दाखवला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार

देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवायचं, हे जनतेने नजरेत ठेवलय. पंतप्रधानांनी बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळेच मनमोहन सिंग यांनी टिप्पणी केली आहे. त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या पदावर आहोत आणि कुठल्या व्यक्तींने कुठल्या स्तरावरील राजकारण करावे, यापेक्षा दुर्दैव या देशाचे कधीच झालं नाही. दहा वर्षे साधू-संतांना विचारल्या गेले नाही, मात्र आता पंतप्रधान मोदी यांना निवडून आणण्यासाठी वाराणसीत साधूच्या बैठका घेतल्या जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार. तर बिहारमध्ये भाजपा साफ झाली आहे. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा अशी स्थितीत सरकार 

सध्या विजय वडेट्टीवार मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागाची  प्रचंड वाईट अवस्था आहे. कुठेही पाण्याचा पत्ता नाही. मराठवाडा विभागात आत्ता साडेसात हजार टँकर सुरू आहे.संभाजीनगर शहरात 750 टँकर सुरु आहे. शेततळे बंधारे आणि विहिरीत पाणी नाही. डाळिंब,लिंबू, संत्री अशी शेती वाळून गेली आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर झाली नाही. केवळ पंचनामा करुन पोट भरत नाही, तर पंचनामा झाल्यावर तात्काळ मदत दिल्यावर पोट भरत असते.

हे टेंडरबाज सरकार जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा, अशी स्थितीत असल्याची बोचरी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर उद्या उद्या दहा वाजता नागपूर विभागाची बैठक बोलावली असून त्यानंतर आमचा दौरा ठरविण्यात येणार असून शेतकऱ्यांना नवीन कर्ज आणि बियाण्याची सोय करून दिली पाहिजे अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

छगन भुजबळ यांना नाराज होण्याचे काही कारण नाही

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठनेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की,  सध्या तरी त्यांचं नाराज होण्याचे काही कारण नाही. पण 4 जुनचा निकाल लागल्यावर छगन भुजबळ यांची नाराजी आहे की नाही, ते स्पष्ट होईल. तसेच त्यांनीही माझी कोणतीही नाराजी नाही म्हणुन स्पष्ट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी जाणून बुजून केलेली चूक नव्हे तर, अनावधानाने झालेली ती चूक आहे. ते पुरोगामी विचाराचे व्यक्ती आहेत. बाबासाहेबांचे विचार घेऊन त्यांनी सातत्याने किल्ला लढवला आणि मनुस्मृति विरोधात सातत्याने त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्याचं बाऊ करून मनुस्मृति प्रकरण दाबण्याचे काम केलं जात आहे. असे माझे स्पष्ट आरोप असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget