एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, 80-90 जागांवरुन भुजबळांनी भाजपला सुनावलं!

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी छगन भुजबळांचं मोठं भाष्य. टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना सडेतोड प्रत्युत्तर. जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलणं हा माझा अधिकार, सारखं भुजबळांना समज द्या, समज द्या बोलता.

नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाला 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत. महायुतीमध्ये सामील होताना आम्हाला तसा शब्द देण्यात आला होता, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन बराच गदारोळ झाला होता. भुजबळांच्या या मागणीमुळे भाजपचे नेते बरेच दुखावले गेले होते. भुजबळांना आवरा, असेही भाजपच्या नेत्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आता मनुस्मृती आणि त्यापाठोपाठ जागावाटपाच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्या भाजपच्या (BJP) नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, असे भुजबळांनी खमकेपणाने भाजप नेत्यांना सुनावले आहे. ते शुक्रवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ यांना त्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन भाष्य केल्यानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर छगन भुजबळ यांनी म्हटले की, मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. पण त्याचेही लोकांना वाईट वाटले. भुजबळ असं कसं बोलू शकतात, अशी ओरड त्यांनी केली. त्यामुळे मी आता प्रसारमाध्यमांसमोर बोलणार नाही. मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना ते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली. पण त्यावरुन तुम्ही चर्चा करता, चॅनलमध्ये बोलता, भुजबळांना समज द्या, असे बोलले जाते. 

तुम्ही तुमच्या पक्षात बोलता तेव्हा आम्ही कुठे काय म्हणतो? तुमच्या पक्षात काय बोलावे हा तुमचा अधिकार आहे. तसेच मी माझ्या पक्षात काय बोलावे हा माझा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांनी मान्य केला पाहिजे. शेवटी निर्णय चर्चेतून  होणार, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

एक्झिट पोलबाबत छगन भुजबळांचं भाष्य

यावेळी छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत भाष्य केले. महाविकास आघाडीचा पराभव होईल व महायुतीचे मोठ्या संख्येने विजयी होईल, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील. दोन-चार जागा चुकुनमाकून महाविकास आघाडीला जातील, असा दावा भुजबळ यांनी केला.

भाजपाच आमचा बिग ब्रदर, त्यांनाच जास्त जागा मिळणार: छगन भुजबळ

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपात खटपट होता कामा नये. विधानसभेत आपल्याला 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण होताच छगन भुजबळ यांनी यू-टर्न घेतला होता. माझ्या वक्तव्याबद्दल महायुतीला वाईट वाटायचं काही कारण नाही. भाजप आमचा मोठा भाऊ आहे. त्यामुळं त्यांना जास्त जागा मिळणार आहेत. बाकी दोन पक्षांना चांगल्या जागा मिळतील, अशी सारवासारव छगन भुजबळ यांनी केली होती.

आणखी वाचा

छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही, भाजप नेत्यांचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget