एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar : 2029 मध्ये अमित शाह दिल्लीत पण नसतील, सध्या ते स्वतः कुबड्या घेऊन सत्तेत आहे, विजय वडेट्टीवार यांची टीका 

Vijay Wadettiwar : 2029 मध्ये अमित शाह हे दिल्लीत पण नसेल. सत्ता तर दूर, यांना राज्यात फिरणेही अवघड होईल, असा टोला विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अमित शाह आणि सरकारला लगावला आहे. 

Vijay Wadettiwar: 2029 मध्ये अमित शाह (Amit Shah) दिल्लीत पण नसेल, सध्या ते स्व:ता कुबड्या घेऊन सत्तेत आहे. घोटाळे करणारे हे सरकार आहे. महाराष्ट्राला हे सरकार नको आहे. कॅबिनेटमध्ये सरकार दिवाळीखोरी करत असल्याची नोंद आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ता तर दूर यांना राज्यात फिरणेही अवघड होईल, असा टोला विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला लगावला आहे. 

भाजप दुतोंडी साप, जिकडे भक्ष्य तिकडे जातात. वापर झाला की फेकून देतात. जागा वाटपात आम्ही खूप पुढे गेलो आहोत. नवरात्रीमध्ये अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू. तर  बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. तसेच उरलेल्या जागांवर 8, 9,10 ला सलग बैठक आहे. देवीचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला आहे.  

ओबीसी आंदोलन दाबण्याचा प्रकार हाकेच्या निमित्याने होत आहे- विजय वडेट्टीवार 

राज्यातील 38 जागेवर मैत्रीपूर्ण लढत हा विषय कुठून आला, हे माहिती नाही. मात्र आम्ही आगामी निवडणूक आम्ही मविआ म्हणूनच लढू. राज्यात धनगरांना आरक्षण देऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री सांगतात. ओबीसी आरक्षणाचे नुकसान होईल, अशी भूमिका सरकार ने घेतलीय. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईमध्ये कुठल्या मुद्द्यावर वापस घेतलं, हे सांगितलं पाहिजे. मात्र आम्ही विरोधात असताना आमचीच भूमिका हे लोक विचरत असल्याचेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.ओबीसी आंदोलन दाबण्याचा प्रकार हाकेच्या निमित्याने होत आहे. देशात गरिबाला नेहमी फसविले जाते. आपटे घरी व्हेज बिर्याणी खात असेल. मात्र पोलीस त्यांना अटक का करू शकत नाही? आरोपी आणि सहकार्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, आरोपी ला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.  

नितीन गडकरी हे कधी कधी सत्य बोलतात

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी हे कधी कधी सत्य बोलतात. मध्यप्रदेशात अर्थ खात्याने सांगितलं लाडकी बहीण योजना चालू शकत नाही. चार महिन्यात बंद केली. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली, मात्र ती इथे पण बंद होईल, असही विजय वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार 40 टक्केपर्यंत गेला आहे. भाजप लुटारूंची टोळी आहे, लुटा आणि वाटा हीच भाजपची नीती आहे. त्यात प्रत्येकाला हा रोग आहे. श्रद्धेवर घाला घातला जात आहे, साईबाबा ला लाखो लोक मानतात, संताला धर्माशी जोडू नये. तसेच व्होट जिहाद, लव्ह जिहाद हे बोलल्या शिवाय यांना मत मिळत नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि सरकारवर निशाणा साधला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलंRahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवडABP Majha Headlines :  12 PM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ekikaran Samiti : महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
Maharashtra Cabinet: महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Embed widget