एक्स्प्लोर
विदर्भ क्रिकेट असोसिएशननं पोलिसांचे कोट्यवधी रुपये थकवले
नागपूर: विदर्भ क्रिकेट असोसिएशननं गेल्या सहा वर्षांतील पोलीस बंदोबस्ताचे तब्बल 7 कोटी 78 लाख रुपये थकवल्याचा आरोप नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं असून क्रिकेट असोसिएशनची संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मात्र, हा हिशेब चुकिचा असून थकीत रक्कम केवळ 5 कोटी 50 लाख आहे. त्यामुळे योग्य हिशेब द्या आणि एका दिवसात आपले पैसे घेऊन जा अशी भूमिका विदर्भ क्रिकेट असोसिएशननं घेतली आहे.
नागपूरच्या ग्रामीण भागात असलेल्या जामठा स्टेडियमवर गेल्या सहा वर्षांत अनेक क्रिकेट सामने झाले. या सर्वच सामन्यांचे पैसे थकीत असून त्यासाठी बीसीसीआय आणि आयपीएललाही पोलिसांनी पत्र पाठवली. मात्र थकीत रक्कम अजूनही मिळाली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement